Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव यांचा कार्यालय प्रवेश३७२ क्रीडापटूंचे सरकारी सेवेत थेट समावेशन, क्रीडापटूंना आर्थिक बळ देण्यासाठी रोख पारितोषिकेबांधकाम समिती सभापती सारिका नांंदेकर यांचा कार्यालय प्रवेशभुदरगड- चंदगड तालुक्यांपुढे स्वित्झर्लंड देशही फिका, पर्यटनस्थळे विकसित करण्याची गरजउदय सामंत म्हणाले, २०२९ मधील निवडणुकीत संजय मंडलिक हे लोकसभेचे उमेदवारवडगाव येथील मच्छीमार ठेकेदाराचा आत्मदहनाचा इशारासतेज चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ ! प्रॅक्टिस क्लब, वेताळमाळ तालीम विजयी !!छत्रपती शिवराय, करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी रथोत्सव थाटातपतसंस्था फेडरेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी  अरुंधती महाडिक ! खासदार धनंजय महाडिकांना सहकाररत्न पुरस्कार !!राज्यातील २५ बडया अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या, कोल्हापूरला तीन नवीन अधिकारी

जाहिरात

 

३७२ क्रीडापटूंचे सरकारी सेवेत थेट समावेशन, क्रीडापटूंना आर्थिक बळ देण्यासाठी रोख पारितोषिके

schedule05 Apr 26 person by visibility 63 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : क्रीडाक्षेत्र हा करिअरचा सक्षम पर्याय म्हणून सामोरा येत असून राज्य सरकारच्या सकारात्मक व कृतिशील धोरणामुळे येथील राज्यातील क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान प्राप्त होत आहे. विविध क्रीडाप्रकारांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ३७२ खेळाडूंना सरकारी सेवेमध्ये विनापरीक्षा थेट सामावून घेण्यात आले आहे. तसेच क्रीडापटूंना आर्थिक बळ देण्यासाठी आकर्षक रोख पारितोषिकांची तरतूद आहे.’असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

भारतीय विद्यापीठे महासंघ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कनोईंग व कयाकिंग (पुरुष व महिला) स्पर्धांचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते, रविवारी पाच एप्रिल २०२६ रोजी सकाळी येथील कै. वसंतदादा पाटील स्मृती स्मारक, कृष्णा नदीवरील रॉयल बोट क्लब येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी होते. आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, कलापि उद्योगाचे योगेश लोहकरे, अधिसभा सदस्य संजय परमणे, काव्यश्री नलवडे आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले,‘आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना थेट वर्ग एकची शासकीय नोकरी, राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक विजेत्यांना वर्ग दोन, तर राज्य स्तरावरील विजेत्यांना वर्ग तीन व चारची पदे देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्यांना रुपये २ कोटी, राष्ट्रीयस्तरावर रूपये एक कोटी आणि राज्यस्तरावर रुपये ५० लाख इतकी बक्षिसे दिली जात आहेत’

 प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, शिवाजी विद्यापीठाला शिक्षण, संशोधन आणि क्रीडा क्षेत्रातील सहा दशकांची समृद्ध परंपरा लाभली असून क्रीडा क्षेत्रातही विद्यापीठ अग्रस्थानी आहे. कृष्णा नदीवरील स्पर्धेचा ट्रॅक हा शास्त्रीयदृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून पाण्याचा प्रवाह स्थिर असल्यामुळे सर्व स्पर्धकांना समान संधी मिळते.  क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. महादेव ठोंबरे, सोनाली पाटील व डॉ. श्रीदेवी पवार-हिरुगडे यानी सूत्रसंचालन केले, तर अधिसभा सदस्य श्रीनिवास गायकवाड यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes