बांधकाम समिती सभापती सारिका नांंदेकर यांचा कार्यालय प्रवेश
schedule05 Apr 26 person by visibility 38 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य विभागाच्या सभापती सारिका यशवंत नांदेकर यांच्या नूतन दालन प्रवेशाचा कार्यक्रम उत्साहात झाला. पालकमंत्री प्रकाश आबिकटर, आमदार अशोकराव माने, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, माजी खासदार संजय मंडलिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी आमदार सुजित मिणचेकर, के. जी. नांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालय प्रवेशाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी पालकमंत्री आबिटकर म्हणाले, ‘शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीच महिलांना राजकारणात मानाचे स्थान मिळावे, यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांनी हा विचार फक्त बोलण्यापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत आणून ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत अनेक लाडक्या बहिणींना महत्त्वाची पदे दिली आहेत. सारिका नांदेकर यांनी स्वतःला केवळ एका जिल्हा परिषद मतदारसंघाच्या प्रतिनिधी न समजता बारा तालुक्यांच्या सभापती समजावे आणि विकसित विकासासाठी प्रभावीपणे काम करावे.’ याप्रसंगी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय बलुगडे, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अरुण जाधव, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, कृषी संचालक दत्तात्रय उगले, शिक्षण सभापती शितल यादव, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी आबिटकर, पंचायत समिती सभापती विक्रम पाटील, संतोष जोशी, अभय तेंडुलकर उपस्थित होते .