Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळसाठी महायुतीच्या घडामोडी वेगावल्या, तीन मंत्री -खासदार- आमदारांची उपस्थिती ! आमदार शिवाजी पाटील ही बैठकीला!!चचणडडदिल्लीतील सौंदर्य विषयक परिषदेत डॉ. उद्धव पाटील यांचे मार्गदर्शन कोल्हापुरात भाजपातर्फे ज्योती यात्रा उत्साहात, शहरातून मोटरसायकल रॅलीवंचितांच्या सिनेमावर सखोल अभ्यास आवश्यक : मेघराज राजेभोसलेमहायुतीत एकमत होईना, उमेदवारांची घोषणा गुरुवारीचपुणे शिक्षक मतदारसंघासाठी ६७ अर्ज ! ४० हून अधिक उमेदवार !!माळी समाजाच्या घरगुती गणेश सजावट, झिम्मा फुगडी स्पर्धेला प्रतिसाद, बक्षीस समारंभ उत्साहातशक्तीप्रदर्शन करत भैया मानेंनी भरला उमेदवारी अर्ज, सर्वसामान्य पदवीधर हाच माझा पक्ष !महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन, शिक्षकमधून जयंत आसगावकर, पदवीधरसाठी हर्षदा देशमुखांचा अर्ज ! नेतेमंडळीची उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित!!

जाहिरात

 

गोकुळसाठी महायुतीच्या घडामोडी वेगावल्या, तीन मंत्री -खासदार- आमदारांची उपस्थिती ! आमदार शिवाजी पाटील ही बैठकीला!!

schedule07 Oct 26 person by visibility 148 category

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी महायुतीमध्ये घडामोडी वेगळ्या आहेत. हॉटेल पॅव्हेलियन येथे महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील हे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहिले आहेत. महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ही निश्चित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आठ आणि यड्रावकर गटाला एक असे एकूण नऊ जागा  आहेत. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येकी सात जागा, जनसुराज्य शक्ती पक्षाला दोन जागा अशी विभागणी करण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला दहा जागा हव्या आहेत.
गोकुळ दूध संघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आठ ऑक्टोबर 2026 पर्यंत आहे. 8 ऑक्टोंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हांचे वाटप होणार आहे .त्यामुळे उमेदवार निश्चिती करण्यासाठी महायुतीमध्ये दिवसभर घडामोडी सुरू होत्या. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी पहिल्यांदा स्वतंत्र बैठका झाल्या. सायंकाळी हॉटेल  पॅवेलियन येथे महायुतीमधील सगळ्या नेते मंडळींची बैठक सुरू झाली. मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर,  खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके,  माजी आमदार के पी पाटील हे या बैठकीला उपस्थित राहिले आहेत. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांचे हॉटेल पॅव्हेलियन येथे आगमन झाले. ते ही बैठकीत सामील झाले. कोणत्या पक्षाला किती जागा, कोण कोणत्या संवर्गातून लढणार यासंदर्भात चर्चा सुरू आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes