Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नीट -  सीबीएसई परीक्षतील घोटाळ्यांविरोधात काँग्रेसचा कँडल मार्चशिवराज्याभिषेक सोहळयासाठी कोल्हापूर हायकर्सतर्फे जल संकलनआठवणीतीले दवबिंदू कवितासंग्रहातून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची मानसिकता लाभते– प्राचार्य जी.पी.माळीनिरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती – भरत रसाळेकोल्हापुरात गुरुवारी महाराष्ट्र धर्म याविषयी परिषदकोल्हापूर मेट्रोसिटीसाठी राजू मानेंचे धरणे आंदोलनराष्ट्र सेवा दलातर्फे दोन दिवसीय कार्यकर्ता कार्यशाळा - जिल्हास्तरीय मेळावापाच- सहा जूनला रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळाप्रशासनाधिकारी डी. सी.कुंभारांना लाच घेताना रंगेहाथ पकडले, पोलिसांची कारवाईजिल्हा नियोजन समितीची पुढील बैठक सदस्यांसोबतच, लवकरच निवडी होणार - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

नीट -  सीबीएसई परीक्षतील घोटाळ्यांविरोधात काँग्रेसचा कँडल मार्च

schedule02 Jun 26 person by visibility 11 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नीट आणि सीबीएसई परीक्षेतील घोटाळयांविरोधात काँग्रेस पक्षातर्फे कोल्हापुरात सोमवारी एक जून २०२६ कँडल मार्च काढण्यात आला. ‘पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्याच भवितव्य अंधकारमय बनले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ’ अशी मागणी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चीब यांनी केली.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, राज्य सरचिटणीस अजय छिकारा, युवा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी नवज्योतसिंग संधू, शांभवी शुक्ला, नेहल चौपाने यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा निघाला. राजर्षी शाहू समाधी स्थळ येऊन मोर्चाला सुरुवात झाली. टाऊन हॉल, भाऊसिंगजी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मोर्चा निघाला. पेपरफुटी घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई न केल्याबद्दल युवक आणि विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात आक्रोश केला.

काँग्रेसचे पदाधिकारी बाळासाहेब सरनाईक, जिल्हा परिषदेतील गटनेते एकनाथ पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब, बिद्री कारखान्याचे संचालक राहुल बजरंग देसाई, महापालिका विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता इंद्रजीत बोंद्रे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष उदय पोवार, जिल्हाध्यक्ष वैभव तहसीलदार, नगरसेवक सुभाष बुचडे, प्रतापसिंह जाधव, संजय मोहिते, अर्जुन माने, विनायक कारंडे, विनायक फाळके, प्रशांत खेडकर, विशाल चव्हाण, अमर समर्थ, सचिन शेंडे, सचिन चौगले, उमेश पोवार, रोहित कवाळे, राहुल माने, नगरसेविका ऋग्वेदा माने, दीपाली घाटगे, स्वाती कांबळे, पुष्पा नरुटे, अनुराधा मुळीक, वेदवती मोहिते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes