Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वर्षा गगराणी अनुवादित चौदा पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळाआदमापूरमधील शपथेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करणार, बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर आंदोलनकोल्हापूर शहर, करवीरमधून आसगावकरांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार! कळंब्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावाकौस्तुभ गावडेंना शिक्षकांचा वाढता प्रतिसाद, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलीय - दादासाहेब लाडकौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणारमहाविकास आघाडीचे पदवीधर – शिक्षकचे उमेदवार कर्तृत्ववान - खासदार सुप्रिया सुळेराज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनएआयच्या युगात वाचनसंस्कृती जपणे काळाची  गरज : डॉ. युवराज दीक्षितमंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!

जाहिरात

 

विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस ! मुंबईत घोषणा, कोल्हापुरात आनंदोत्सव !!

schedule04 Dec 24 person by visibility 704 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :   भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. मुंबईत या निवडीची घोषणा होता स कोल्हापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सासव साजरा केला.  भाजपा जिल्हा कार्यालय या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटले होते.

 कार्यकर्त्यांनी, "देवेंद्र फडणवीस आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो" अशा घोषणा देत एकमेकांना लाडू भरून हा क्षण साजरा केला.
 जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, " संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. सर्वसामान्य जनता आणि  कार्यकर्त्यांची इच्छा होती की  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस व्हावेत. आज इच्छा पूर्ण होत आहे."
याप्रसंगी भाजप प्रदेश सचिव  महेश जाधव, राहुल चिकोडे, नाथाजी पाटील, हंबीरराव पाटील, गायत्री राऊत, डॉ. सदानंद राजवर्धन, विठ्ठल पाटील, संगीता खाडे, राजू मोरे, शैलेश पाटील, राजसिंह शेळके, भरत काळे, विशाल शिराळकर, गिरीष साळोखे, महेश यादव, अशोक लोहार, सयाजी आळवेकर, दिलीप बोंद्रे, विजय गायकवाड,  भिकाजी जाधव, दत्तात्रय मिडशिंगे, शिवाजी बुवा, विजय आगरवाल,  अरविंद वडगावकर, अॅड. संपतराव पवार, दिलीप मैत्राणी, रीमा पालनकर, मनोज इंगळे, रविकिरण गवळी, निरंजन घाटगे, सुमित पारखे, रोहित करंडे, विवेक कुलकर्णी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes