Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येचा प्रश्न विधानपरिषदेतपालकमंत्र्यांनी बुलेट चालवत नोंदविला मिलेट महोत्सव रॅलीत सहभागशिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम ठेवावे : सुप्टाची मागणीउपमुख्यमंत्र्यांच्यासोबत हद्दवाढप्रश्नी सोमवारी मुंबईत बैठक राजमाता जिजाऊ रथयात्रेचे गोकुळतर्फे स्वागतशिवाजी विद्यापीठ नावासंबंधी शिवप्रेमींची शनिवारी बैठकमहापालिकेची कोल्हापूर शहर-गांधीनगरात कारवाई, पाच हजार किलो प्लॅस्टिक जप्तथकबाकीपोटी कोटीतार्थ मार्केटमधील पाच दुकान गाळे सील भगवान महावीर अध्यासनासाठी एक लाखाची देणगी तिटवे येथे होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहात ! लतिका कांबळेने जिंकली मानाची पैठणी ! !

जाहिरात

 

सीबीएस परिसरात पोलिस अधिकारी-आराम बस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी

schedule29 Jan 25 person by visibility 156 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मंगळवारी सहायक पोलिस निरीक्षक आणि खासगी बस ट्रॅव्हल्सच्या एजंटामध्ये हाणामारीचा खळबळजनक प्रकार घडला. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी आहेत. दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक विशाल दशरथ मुळे यांनी खासगी बस ट्रॅव्हल्सच्या तिघा एजंटाविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी, जावेद मुजावर व दिलदार मुजावर या दोघांना पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी ताब्यातही घेतले आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेने, बस ट्रॅव्हल्सच्या कर्मचाऱ्यांनी तिकिटाचे पैसे मागितल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान यासंबंधी शाहूपुरी पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल मुळे हे हायकोर्टातील सुनावणीसाठी मुंबईला गेले होते. मंगळवारी ते कोल्हापुरात पोहोचले. शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे जात असताना खासगी बसचे एजं आकिब पठाण त्यांच्याकडे आला. पुण्याला जाणारी बस आहे असे सांगत पोलिस अधिकाऱ्याला ओढून तिकडे नेले. यावेळी मुळे यांनी मी पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले. पण पठाण हा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. यामुळे दोघांमध्ये वादावादी झाली. वादावादी वाढत जाऊन यामध्ये मुळे यांना मारहाण करण्यात आली. मुजावर व पठाण असे तिघांनी मिळून मारहाण केल्याचे मुळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी, दोघा मुजावर कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांनी, खासगी बस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याचे समजताच बुधवारी सकाळी आराम बस चालक व इतर कर्मचाऱ्यांनी महालक्ष्मी चेंबरसमोर गर्दी केली.   

  दुसरीकडे कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीश कांबळे यांनी याप्रकरणी पत्रक प्रसिद्धीस देऊन पोलिस अधिकाऱ्यांनी मारहाणीचा कांगावा केला. पत्रकात म्हटले आहे, ‘अशोक दशरथ मुळे ज्यांनी आमच्या व्यवसायासंदर्भात कांगावा केलेला आहे ते अधिकारी देखील एक दिवसापूर्वीच आमच्या बसमधून शुल्क न घेता आम्ही मुंबईला पाठवलेले होते. मुळात हे अधिकारी सिविल ड्रेसवर होते. त्यांनी मारहाण केल्यानंतर मी पोलीस अधिकारी आहे असे ते म्हणत होते. व कोणतेही तिकिटाचे पैसे देणार नाही असे सांगत होते. ट्रॅव्हल्सचे कर्मचारी दिलदार मुजावर आणि आकिफ पठाण हे स्वतःहून शाहूपुरी पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी गेले. त्यावेळेस ए.पी.आय. मुळे यांनी तिथे जाऊन त्या दोघांना मारहाण केली. आमची मागणी आहे की, मध्यवर्ती बस स्थानकासमोर व्हिडिओ कॅमेरे आहेत ते फुटेज आम्हाला द्यावे. त्यामध्ये कशाप्रकारे या अधिकाऱ्याने सर्वसामान्य काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली ते उघड होईल.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes