Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मुलांनो , आई-वडिलांची स्वप्ने बना : शिक्षक नेते भरत रसाळेकेमटी रोजंदारी कर्मचारी कायम होणार, दोन दिवसात आदेश राजेश क्षीरसागरजैन मुला -मुलींसाठी राज्यात सोळा वसतिगृहे उभारणार, कोल्हापुरात प्रशासनाकडे जागेची मागणी -ललित गांधीसोलापूरच्या डेप्युटी सीईओ स्मिता पाटील यांची कोल्हापूरला बदलीशंभर टक्के निधीवर सदस्य ठाम, ५० – ५० चा फॉर्म्युला अमान्य ! अध्यक्ष - सीईओंना गुरुवारी पत्र देणार, पदाधिकाऱ्यांची कोंडी ! ! गांधीनगरातील व्यापाऱ्यावर पाच हजारांचा दंड ; १४४ किलो प्लास्टिकचा साठा जप्तमानवकल्याणाचा भाव जागृतीसाठी विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज - डॉ. भूषण पटवर्धन महसूलमंत्र्यांच्या सोबत क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक !  सातबारा – रेडीरेकनर - प्रॉपर्टी कार्डसंदर्भात सकारात्मक चर्चा ! !कंगना राणावतांच्या विरोधात कोल्हापुरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक, हाती घेतले चप्पलगोकुळचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करा : सर्किट बेंचचा आदेश

जाहिरात

 

मुलांनो , आई-वडिलांची स्वप्ने बना : शिक्षक नेते भरत रसाळे

schedule30 Jul 26 person by visibility 25 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ' शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात येणारी दहा वर्षे  महत्त्वाची असून स्वतःची स्वप्ने पहाच पण मुलांनो , तुम्ही आई-वडिलांची स्वप्ने बना असे आवाहन  महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष शिक्षक नेते भरत रसाळे यांनी केले. ते, कसबा ठाणे येथील जय शिवराय हायस्कूल मधील इयता १०वीच्या  गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण व गुरुवंदना कार्यक्रमात बोलत होते .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपसरपंच उमेश पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक रोहित हवलदार , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व्यंकट पाटील, युवराज जांबोळीकर व बी . डी .पाटील हे होते .
 रसाळे  यांच्या हस्ते तालुक्यात प्रथम आलेल्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी ,प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना रसाळे सर म्हणाले की '  विद्यार्थ्यानी आईवडील गुरूजन यांचा आदर ठेवून मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शिस्त, चिकाटी ठेवून सातत्यपूर्ण परिश्रम, करावे पण त्याच बरोबर तुम्ही आईवडीलांची स्वप्ने  बनून ती पूर्ण करा " असे आवाहन त्यांनी केले . विद्यार्थ्यांनी गुरुवंदना गीत गाऊन गुरुजनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली .
 मुख्याध्यापक संजय व्हनागडे यांनी प्रास्ताविक केले. सुनील पाटील यांनी  सूञसंचालन केले. दिपीका पाटील यांनी आभार मानले.  कार्यंक्रमास अनिल आडनाईक , अशोक कांबळे, तेजस्विनी महाडीक  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes