Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सोलापूरच्या डेप्युटी सीईओ स्मिता पाटील यांची कोल्हापूरला बदलीशंभर टक्के निधीवर सदस्य ठाम, ५० – ५० चा फॉर्म्युला अमान्य ! अध्यक्ष - सीईओंना गुरुवारी पत्र देणार, पदाधिकाऱ्यांची कोंडी ! ! गांधीनगरातील व्यापाऱ्यावर पाच हजारांचा दंड ; १४४ किलो प्लास्टिकचा साठा जप्तमानवकल्याणाचा भाव जागृतीसाठी विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज - डॉ. भूषण पटवर्धन महसूलमंत्र्यांच्या सोबत क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक !  सातबारा – रेडीरेकनर - प्रॉपर्टी कार्डसंदर्भात सकारात्मक चर्चा ! !कंगना राणावतांच्या विरोधात कोल्हापुरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक, हाती घेतले चप्पलगोकुळचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करा : सर्किट बेंचचा आदेशसत्यशोधक इतिहास परिषदेतर्फे रविवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनसाहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात यावे : डॉ. सुनीलकुमार लवटे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेतर्फे दिवंगत सभासदाच्या वारसांना अर्थसहाय्य

जाहिरात

 

सोलापूरच्या डेप्युटी सीईओ स्मिता पाटील यांची कोल्हापूरला बदली

schedule29 Jul 26 person by visibility 179 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता महादेव पाटील यांची कोल्हापूरला बदली झाली. राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने त्यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली आहे. बाल विकास प्रकल्प् अधिकारी (नागरी) , कोल्हापूर शहर यापदावर नियुक्ती झाली आहे. सहसचिव वि. रा. ठाकूर यांनी बुधवारी, २९ जुलै २०२६ रोजी नियुक्तीचे आदेश काढले आहेत. पाटील या सोलापूर जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्यांची, महिला व बालविकास विभागामध्ये गट अ संवर्गातील पदावर प्रतिनियुक्तीन नियुक्ती देण्याबाबत ग्राम विकास विभागाने सहमती दिली आहे. त्यानुसार पाटील याची महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखालील बाल विकास प्रकल्प अधिकारी कोल्हापूर शहर या पदावर नियुक्ती झाली असे आदेशात म्हटले आहे. पाटील यांनी यापूर्वी २०१९ मध्ये माळशिरस येथे गटविकास अधिकारी म्हणून काम केले आहे. याशिवाय सोलापूर येथे त्यांनी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन प्रकल्प संचालक, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामाचा ठसा उमटविला.चंद्रपूर येथेही त्यांनी काम केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes