Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केमटी रोजंदारी कर्मचारी कायम होणार, दोन दिवसात आदेश राजेश क्षीरसागरजैन मुला -मुलींसाठी राज्यात सोळा वसतिगृहे उभारणार, कोल्हापुरात प्रशासनाकडे जागेची मागणी -ललित गांधीसोलापूरच्या डेप्युटी सीईओ स्मिता पाटील यांची कोल्हापूरला बदलीशंभर टक्के निधीवर सदस्य ठाम, ५० – ५० चा फॉर्म्युला अमान्य ! अध्यक्ष - सीईओंना गुरुवारी पत्र देणार, पदाधिकाऱ्यांची कोंडी ! ! गांधीनगरातील व्यापाऱ्यावर पाच हजारांचा दंड ; १४४ किलो प्लास्टिकचा साठा जप्तमानवकल्याणाचा भाव जागृतीसाठी विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज - डॉ. भूषण पटवर्धन महसूलमंत्र्यांच्या सोबत क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक !  सातबारा – रेडीरेकनर - प्रॉपर्टी कार्डसंदर्भात सकारात्मक चर्चा ! !कंगना राणावतांच्या विरोधात कोल्हापुरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक, हाती घेतले चप्पलगोकुळचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करा : सर्किट बेंचचा आदेशसत्यशोधक इतिहास परिषदेतर्फे रविवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन

जाहिरात

 

जैन मुला -मुलींसाठी राज्यात सोळा वसतिगृहे उभारणार, कोल्हापुरात प्रशासनाकडे जागेची मागणी -ललित गांधी

schedule30 Jul 26 person by visibility 8 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : देशात, राज्यात अत्यंत अल्पसंख्यांक असणाऱ्या जैन समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहासाठी आणण्यासाठी आपला प्रयत्न राहील. राज्यातील आठ जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने जैन मुला-मुलींचे प्रत्येकी 1 याप्रमाणे 16 वसतिगृह उभारण्यात येणार आहेत. कोल्हापुरातही येत्या आर्थिक वर्षाअखेर या वसतीगृह उभारणीला प्रारंभ होईल. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे दोन एकर जागा मागितली आहे. प्रतिपादन जैन अल्पसंख्यांक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.
   जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जैन समुदायाच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ते पुढे म्हणाले,  जैन समुदायातील मुलांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी मदत होईल.जिल्ह्यात या समुदायाची 8-क तर 3- ब वर्गाची तीर्थक्षेत्र असून यांच्या विकासाकरिता शासन अनुकूल आहे . समाजाच्या विकासासाठी शासनाकडून मिळणारा निधी हा समाजाच्या पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने खर्च करण्याला आपले प्राधान्य असेल. या अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता नसल्याचे ते म्हणाले .
         जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड म्हणाले,जैन समुदायाच्या विकास विषयक कामांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे सादर करण्यात येतील. जिल्ह्यात ज्या गावात जैन समुदायाच्या लोकांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी पोलीस विभागाने शांतता कमिटीत जैन समुदायातील लोकांना स्थान द्यावे. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास निधीतून स्थानिक तीर्थक्षेत्रामध्ये लोकपयोगी कामे करण्याला जिल्हा प्रशासनाचे प्राधान्य असेल.
        जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जॅसमीन यांनी जैन समुदयासाठी महिला व बाल विकास विभागातर्फे(एकात्मिक बाल विकास सेवा योजना) राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली.     या बैठकीत जैन धर्मियांना येणाऱ्या विविध अडचणींचा सामना उपस्थित प्रतिनिधींनी यावेळी सांगितला. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, शहर अभियंता रमेश मस्कर जिल्हा अग्रणी बँकेचे उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes