Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खासदार निलेश लंकेच्या पुढाकारातून रविवारी भुदरगड स्वच्छता मोहीमशाश्वत प्रतिष्ठानतर्फे वारी परिवारचे स्वागतसोमवारी कोल्हापुरातील सी - डी वार्डातील पाणीपुरवठा बंदशहीद महाविद्यालयात रंगला यूथ फेस्टिव्हलमधील विजेत्या विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा20 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत गोकुळश्री स्पर्धाडी वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव, 90 वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजराकोल्हापुरात आपुलकीचा फराळ !दाजीपूर अभयारण्यमध्ये शुक्रवारपासून जंगल सफारीखाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे शून्य टक्के व्याजदराने ई-बाइकचे वितरणरांगडे कोल्हापूर…हटके स्पर्धा ! दुचाकी चालवित नेतेमंडळींनी वाढविला उत्साह!!

जाहिरात

 

लोहिया चेस अॅकेडमीत बुद्धिबळ स्पर्धेला उत्साहात सुरुवात

schedule01 Jul 24 person by visibility 474 categoryक्रीडा


महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  :- महालक्ष्मी हॉस्पिटल कोल्हापूर पुरस्कृत सतरा वर्षाखालील मुलामुलींच्या जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा पद्माराजे गर्लस् हायस्कूल मधील कै.लतादेवी अनिल लोहिया चेस अकॅडमीमध्ये उत्साहात सुरू झाल्या.
स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार होणाऱ्या या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत ७६ बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे व दोशी हॉस्पिटलचे डॉ. रिषी दोशी यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
 यावेळी व्यासपीठावर न्यू एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव श्रीकांत चव्हाण, सयाजी पाटील,निकिता दोशी, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, मनीष मारुलकर धीरज वैद्य, उत्कर्ष लोमटे व रवी आंबेकर,अमित दिवाण,अर्पिता दिवाण उपस्थित होते. मुलांच्या गटात चौथ्या फेरीनंतर अग्रमानांकित कोल्हापूरचा ऋषिकेश कबनूरकर द्वितीय मानांकित कोल्हापूरचा शंतनू पाटील व तृतीय मानांकित जांभळीचा अभय भोसले हे तिघेजण चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.चौथा मानांकित कोल्हापूरचा यश भागवत साडेतीन गुणासह द्वितीय स्थानावर आहे.
मुलींच्या गटात तिसऱ्या फेरीनंतर अग्रमानांकित जयसिंगपूरची दिव्या पाटील व द्वितीय मानांकित जयसिंगपूरची दिशा पाटील या जुळ्या बहिणी अडीच गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.तृतीय मानांकित नांदणीची सिद्धी बुबणे, चतुर्थ मानांकित नांदणीची संस्कृती सुतार, पाचवी मानांकित जयसिंगपूरची सिद्धी कर्वे, जुई चोरगे, वेदिका मदने व वृद्धी गायकवाड या सहा जणी दोन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes