५२ माजी नगरसेवक पुन्हा निवडणुकीच्या मैदानात ! एकेकाळचे मित्र आता आमनेसामने !!
schedule03 Jan 26 person by visibility 138 categoryमहानगरपालिका
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापूर महापालिकेसाठी २० प्रभागातून तब्बल ३२७ उमेदवार नगरसेवकपदासाठी नशीब आजमावत आहेत. पंधरा जानेवारी २०२६ रोजी ८१ नगरसेवक निवडण्यासाठी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर प्रत्यक्ष चित्र स्पष्ट झाले आहे. दहा वर्षांनी होत असलेल्या या निवडणुकीसाठी तब्बल ५३ माजी नगरसेवक पुन्हा निवडणूक लढवित आहेत. यामध्ये दोन माजी महापौर, तीन माजी उपमहापौर, स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासह नगरसेवकांचा समावेश आहे.
२०२४ मधील विधानसभा निवडणुकीनंतर नगरसेवकांनी मोठया संख्येने पक्षांतर केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना अशा सर्वच पक्षात इनकमिंग आणि आऊटगोईंग झाले आहे. यामुळे एकेकाळी एकाच पक्षातील नगरसेवक यंदा आमनेसामने उभे ठाकले आहेत. दरम्यान उमेदवारीवर नजर टाकली तर काँग्रेस पक्षाकडून सर्वाधिक २२ माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये एका अपक्ष नगरसेवकाला काँग्रेसने पुरस्कृत केले आहे. भारतीय जनता पक्षाकडून नऊ माजी नगरसेवक तर शिवसेनेकडून आठ नगरसेवक निवडणूक लढवित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून चार माजी नगरसेवक निवडणूक लढणार आहेत. ऐनवेळी निवडणुकीत उतरलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडून सात नगरसेवक पुन्हा निवडणूक लढवित आहेत. दोन माजी नगरसेवक अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.शिवसेना ठाकरे पक्षाकडून एक माजी नगरसेविका उमेदवार आहेत.
काँग्रेस : सुभाष बुचडे (प्रभाग क्रमांक एक), प्रकाश पाटील (प्रभाग क्रमांक तीन), राजेश भरत लाटकर (प्रभाग क्रमांक चार), स्वाती सागर यवलुजे (प्रभाग क्रमांक पाच), अर्जुन आनंद माने (प्रभाग क्रमांक पाच), तेजस्विनी नागेश घोरपडे (प्रभाग क्रमांक सहा), प्रतापसिंह दत्ताजीराव जाधव (प्रभाग क्रमांक सहा), उमा शिवानंद बनछोडे (प्रभाग क्रमांक सात), इंद्रजीत पंडित बोंद्रे (प्रभाग क्रमांक आठ), राहुल शिवाजीराव माने (प्रभाग क्रमांक नऊ), दत्ताजी टिपुगडे (प्रभाग क्रमांक दहा), दीपा मगदूम (प्रभाग क्रमांक दहा), जयश्री सचिन चव्हाण (प्रभाग क्रमांक अकरा), ईश्वर शांतिलाल परमार (प्रभाग क्रमांक बारा), विनायक फाळके (प्रभाग क्रमांक चौदा), संजय वसंतराव मोहिते (प्रभाग क्रमांक पंधरा),पद्मावती पाटील (प्रभाग क्रमांक सोळा), प्रवीण केसरकर (प्रभाग क्रमांक सतरा), भूपाल शेटे (प्रभाग क्रमांक अठरा), सर्जेराव साळोखे (प्रभाग क्रमांक अठरा), कग् मधुकर रामाणे (प्रभाग क्रमांक १९), राजू आनंदराव दिंडोर्ले (प्रभाग क्रमांक २०).
भाजप : दिलीप पोवार (प्रभाग क्रमांक चार), संजय बाबूराव निकम (प्रभाग क्रमांक चार), पल्लवी निलेश देसाई (प्रभाग क्रमांक पाच), अर्चना उत्तम कोराणे (प्रभाग क्रमांक दहा), माधुरी किरण नकाते (प्रभाग क्रमांक बारा), विलास वास्कर (प्रभाग क्रमांक सोळा), मुरलीधर जाधव (प्रभाग क्रमांक सोळा), रुपाराणी निकम (प्रभाग क्रमांक अठरा), विजयसिंह खाडे (प्रभाग क्रमांक १९).
शिवसेना : अर्चना उमेश पागर (प्रभाग क्रमांक दोन), स्मिता मारुती माने (प्रभाग क्रमांक चार), नंदकुमार बाळकृष्ण मोरे (प्रभाग क्रमांक सहा), अनुराधा सचिन खेडकर (प्रभाग क्रमांक आठ), शारंगधर देशमुख व संगीता संजय सावंत (प्रभाग क्रमांक नऊ), प्रकाश रामचंद्र नाईकनवरे (प्रभाग क्रमांक चौदा), अजित जयसिंगराव मोरे (प्रभाग क्रमांक चौदा). राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष : माधवी प्रकाश गवंडी (प्रभाग क्रमांक सहा), महेश सावंत (प्रभाग क्रमांक दहा), यशोदा प्रकाश मोहिते (प्रभाग क्रमांक अकरा), आदिल बाबू फरास (प्रभाग क्रमांक बारा)
जनसुराज्य शक्ती पक्ष : पूजाश्री उदय साळोखे प्रभाग क्रमांक सात, शारदा संभाजी देवणे (प्रभाग क्रमाांक ११), महेश बराले (प्रभाग क्रमांक बारा), रमेश शामराव पुरेकर (प्रभाग क्रमाांक बारा), पद्मजा जगमोहन भुर्के (प्रभाग क्रमांक तेरा), रशीद बारगीर (प्रभाग क्रमांक सतरा), सुभाष रामुगडे प्रभाग क्रमांक १९). शिवसेना ठाकरे पक्ष : प्रतिज्ञा महेश उत्तुरे (प्रभाग क्रमांक पंधरा). अपक्ष : विजय बाबूराव साळोखे (अपक्ष प्रभाग क्रमांक सात), शोभा कवाळे (प्रभाग क्रमांक सतरा)