Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणारमहाविकास आघाडीचे पदवीधर – शिक्षकचे उमेदवार कर्तृत्ववान - खासदार सुप्रिया सुळेराज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनएआयच्या युगात वाचनसंस्कृती जपणे काळाची  गरज : डॉ. युवराज दीक्षितमंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डडशिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडेप्रा. भारती भाविकट्टी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडीजिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत डीआरके कॉलेजची प्राजक्ता रणदिवेचे यश

जाहिरात

 

वाढदिनाला ग्रंथदान उपक्रम, वाचन संस्कृतीला बळ देणारा प्राचार्य !

schedule28 Sep 24 person by visibility 765 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वाढदिवस साजरा करण्याची प्रत्येकाची एक पद्धत असते. दरम्यान कोल्हापुरात एका प्राचार्यामार्फत गेली अठरा वर्ष वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रंथदान उपक्रम राबविला जातो. यंदाही त्यांनी  ६७ ग्रंथ भेट दिले. वाचन संस्कृतीला बळ देणाऱ्या या प्राचार्याचे नाव आहे, डॉ जे के. पवार !
 अर्थशास्त्राचे प्राध्यापक, अभ्यासक म्हणून डॉ. जे. के. पवार यांची ओळख. त्यांची अर्थशास्त्रांशी निगडीत अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.  लेखक व प्राचार्य डॉ. जे. के. पवार  हे २००७ पासून गेली १८ वर्षे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त ग्रंथदान उपक्रम राबवित आहेत. हे वर्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष असल्याने डॉ. पवार यांनी त्यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त "राजर्षी शाहूंची वाड्•मयीन स्मारके" हा बृहद्ग्रंथ जिल्ह्यातील ६७ शाळांमध्ये पोहचविण्याचा संकल्प केला.
 या संकल्पनेतून क्रिएटिव्ह टीचर्स फोरमकडे यावर्षी ६७ शाहू ग्रंथ डॉ. पवार यांनी सुपूर्द केले. राजोपाध्येनगर येथील राजर्षी शाहू अध्यासनामध्ये झालेल्या ग्रंथदान कार्यक्रमामध्ये फोरमचे सदस्य दीपक जगदाळे, संजय कळके, विजय एकशिंगे, महेश सूर्यवंशी, आर. बी. पाटील, अतुल शिंदे आदी उपस्थित होते.  
यापूर्वी डॉ. पवार यांनी कोल्हापूर, कुरुकली, वारणानगर, वडणगे, कोतोली, कोडोली, वाशी, शिरगांव (जि. सांगली) अशा गावातील सार्वजनिक ग्रंथालयांना आपल्या वाढदिवसानिमित्त ग्रंथदान केले आहे. या उपक्रमांतर्गत आजपर्यंत त्यांनी १०५३ ग्रंथ भेट दिले आहेत. यामध्ये थोरामोठ्यांची चरित्रे, गौरवग्रंथ, स्मारकग्रंथ, कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी, स्पर्धा परिक्षेस उपयुक्त पुस्तके आणि संकीर्ण स्वरुपातील पुस्तकांचा, ग्रंथाचा समावेश आहे.

.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes