Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीच्या पीबीएल प्रदर्शनात २३००  विद्यार्थ्यांचे ३५० प्रकल्पांचे सादरीकरणचेअरमन झाले, पण फेटा नाही बांधला…! नेत्याच्या आठवणीने राजेश पाटील भावूक ! !खासदार धैर्यशील मानेंनी साजरी केली वाडयावस्तीवरील लोकांसोबत दिवाळीजिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन मुख्याध्यापक शिक्षण- क्रीडा समितीवर सदस्ययशवंत ब्रिगेड-कोळेकर परिवाराची दिपावलीत सामाजिक बांधिलकी आधार प्रमाणीकरण नसलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धारावेत – प्रसाद पाटीलगोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांना मिळावा मतदानाचा अधिकार - राजू मानेगोकुळच्या चेअरमनपदी राजेश पाटील ! महायुतीचा सतेज पाटलांना धक्का, शशिकांत पाटील पराभूत !!अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी समविचारी- महायुतीचे संचालक गोकुळमध्ये दाखलअध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुयेकर विरुद्ध अजित नरकेंचे नाव आघाडीवर !

जाहिरात

 

चेअरमन झाले, पण फेटा नाही बांधला…! नेत्याच्या आठवणीने राजेश पाटील भावूक ! !

schedule12 Nov 26 person by visibility 54 categoryउद्योग

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन -: कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळवरील सत्ता हे महत्वाचं बलस्थान. गोकुळ ताब्यात असले की जिल्ह्याच्या राजकारणात आपसूक पकड निर्माण होते. यामुळे सगळयाच पक्षाच्या नेतेमंडळीची गोकुळवरील वर्चस्वासाठी धडपड असते. गोकुळवरील सत्तेइतकेच या दूध संघाचा चेअरमनही तितकाच महत्वाचा.’एकवेळ आमदारकी नको…पण गोकुळचे संचालक हवे’असे काही विनाकारण म्हणत नाहीत. चार हजार कोटीची आर्थिक उलाढाल असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादकांशी कनेक्ट निर्माण होतो. जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळचं चेअरमनही तितकेच वजनदार. यामुळे चेअरमनपदासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. चेअरमनपद निवडीदिवशी तर फटाक्यांची आतषबाजी…मिरवणूक….शक्ती प्रदर्शन ठरलेलं. ज्यांची चेअरमनपदी निवड होणार असते ते उमेदवार फेटे बांधून सभेला येतात. निवडीनंतर पुन्हा गुलालाची उधळण आणि पुन्हा फेटा…हे समीकरण ठरलेल.मात्र १० नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या चेअरमन निवडीवेळी वेगळेच चित्र होते…चेअरमनपदी माजी आमदार राजेश पाटील यांची निवड झाली…पण त्यांनी फेटा बांधला नाही…त्यामागील भावना मांडताना ते भावूक बनले.

 दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींनी त्यांच्या डोळयांच्या कडा ओलावल्या. विधानसभा निवडणुकीत आपण पराभूत झालो म्हणून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटा बांधला नव्हता. ही आठवण सांगत त्यांनी वेगळया ऋणानुबंधाला उजाळा दिला. राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी. चंदगडचे माजी आमदार. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी ५५ हजारांहून अधिक मताधिक्क्यांनी विजय मिळवला. मात्र २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना विजयाने हुलकावणी दिली. राज्यात महायुतीची सत्ता आली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री बनले. त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम अडकूर येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी अजित पवार उपस्थित होते. त्यांनी सत्कार स्वीकारला. पण फेटा बांधला नाही. विधानसभा निवडणुकीतील राजेश पाटील यांचा पराभव पवार यांच्या जिव्हारी लागला होता. राजेश पाटील यांना पुन्हा आमदार म्हणून निवडून द्या, एक काय सांगाल तितके फेटे बांधून घेतो म्हणत राजेश पाटील आणि त्यांच्या नातेबंध राजकारणात किती घट्ट आहेत हे दाखवून दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री हसन मुश्रीफ यांचे विश्वासू म्हणून राजेश पाटील यांची ओळख आहे. यंदाच्या गोकुळच्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनेलमधून राजेश पाटील निवडून आले. गोकुळच्या अटीतटीच्या लढाईत, शह काटशहाच्या राजकारणात राजेश पाटील चेअरमन म्हणून निवडून आले. चे अरमन निवडीसाठी दहा नोव्हेंबर २०२६ रोजी संचालक मंडळाची सभा झाली. शासन नियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यामुळे बहुमत महायुतीकडे होते. यामुळे चेअरमन महायुतीचा होणार हे ठरलेले. सभेसाठी महायुतीचे सगळे संचालक फेटेबांधून गोकुळ प्रकल्प कार्यालय येथे दाखल झाले.अपवाद फक्त राजेश पाटील यांचा. त्यांनी गांधी टोपी  परिधान केली होती. चेअरमनपदासाठी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीतील आणखी काही नावे होती. मात्र राजेश पाटील यांची चेअरमनपदी निवड झाली.

चेअरमनपदी निवड झाल्यानंतर सत्कार स्वीकारताना त्यांनी फेटा बांधला नाही. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी फेटा न बांधण्यामागील कारणही स्पष्ट केले. चंदगड तालुक्याला सहा दशकानंतर गोकुळचे चेअरमनपद मिळाले होतं. साहजिकच साऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. कार्यकर्त्यांनी आनंदाला भरते आलेले…मात्र राजेश पाटील यांनी नम्रपणे फेटा बांधण्यास नकार देत अजित पवारांच्या स्मृती जागविल्या. ‘अजित पवार यांनी राजेश पाटील यांना पुन्हा आमदार करा…’असे हे आवाहन केले होते ते सत्यात उतरविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल अशा भावना व्यक्त केल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes