गोकुळच्या चेअरमनपदी राजेश पाटील ! महायुतीचा सतेज पाटलांना धक्का, शशिकांत पाटील पराभूत !!
schedule10 Nov 26 person by visibility 10 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : आरोप- प्रत्यारोप, रस्त्यापासून लढाईपर्यंत ते कोर्टातला युक्तिवाद आणि राजकीय नेत्यांच्या दृष्टीने प्रचंड प्रतिष्ठेचे ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत महायुतीने अखेरबाजी मारली मंगळवारी 10 नंबर 2026 रोजी गोकुळ दूध प्रकल्प येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत महायुतीचे संचालक व चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील यांची चेअरमन पदी निवड झाली अध्यक्ष पदाच्या निवडीत राजेश पाटील आणि समविचारी आघाडीचे उमेदवार संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी 16 विरुद्ध 13 मतानी पराभव केला. राजेश पाटील यांच्या माध्यमातून चंदगड तालुक्याला पहिल्यांदाच गोकुळचे चेअरमनपद मिळाले आहे. चेअरमन पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला.
अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महायुती आणि समविचारी आघाडीमध्ये राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती. मंगळवारी 10 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अध्यक्ष निवड सभेला सुरुवात झाली. या निवडी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध प्रकल्प परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सभेला सुरुवात झाली. दरम्यान या सभेसाठी महायुतीचे बारा संचालक व समविचारी आघाडीचे तेरा संचालक सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गोकुळ दूध प्रकल्प येथे दाखल झाले. याशिवाय शासन नियुक्त चार संचालक हे पोलीस बंदोबस्तामध्ये सभास्थळी दाखल झाले. समविचारी व महायुतीचे संचालक गोकुळ दूध प्रकल्प येथे पोहोचल्यानंतर गोकुळचे शिल्पकार व माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. समविचारी आघाडीचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, शशिकांत खोत बाबासाहेब देवकर, अभिजीत तायशेटे, बाबासाहेब चौगुले, प्रा. किसन चौगुले, विद्याधर गुरंबे, राहुल देसाई, माजी आमदार राजू बाबा आवळे, अंजना रेडेकर भाग्यश्री डोंगळे, बयाजी शेळके, विश्वजीत जाधव हे संचालक आहेत. महायुतीकडून माजी आमदार राजेश पाटील, अजित नरके, अंबरीश घाटगे, वीरेंद्र मंडलिक, अजित पाटील, चेतन नरके, करणसिंग गायकवाड, मदन देसाई, अमरसिंह पाटील, रणजितसिंह पाटील हे संचालक आहेत.
महायुतीकडून चेअरमनपदासाठी माजी आमदार राजेश पाटील, रणजीत के पी पाटील, दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील, आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू आणि संचालक अजित नरके अशी चार नावे चर्चेत होती. सोमवारी सायंकाळी आणि मंगळवारी सकाळी महायुतीच्या नेते मंडळींमध्ये चेअरमनपदाच्या नावासंदर्भात चर्चा झाली. शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक जण अध्यक्षपदासाठी महायुतीत चुरस होती. यामध्ये अखेर राजेश पाटील यांनी बाजी मारली. चेअरमनपदासाठी महायुतीकडून राजेश पाटील तर समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.