Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या निवडणुकीत संचालकपदाच्या चार जागा, एक वर्ष चेअरमनपद हवे- आमदार शिवाजीराव पाटील भाजपचे 1431 ठराव ! गोकुळच्या संचालक मंडळात भाजपच मोठा भाऊ !! खासदार धनंजय महाडिकगोकुळमध्ये अरुण नरके गट भाजपसोबत,  महाडिकांशी दोस्ताना कायमशहीद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरामहात्मा फुले विद्यालयात हॅप्पी डिजिटल क्लासरुम, मॉडेल स्कूलसाठी प्रयत्नशीलकौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे निमशिरगावमध्ये शंभरहून अधिक वृक्षांची लागवडकास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघातर्फे शाहू जयंती साजरीब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या श्रीराम कथा - निरूपण सोहळ्याची सांगता पुणे नव्हे कोल्हापूर हेच विद्येचे माहेरघर ! पुण्यात अभिजनांना विद्या, कोल्हापुरात बहुजनांना शिक्षणाची सुविधा ! ! डॉ. मंजुश्री पवारशिवसेना ठाकरे पक्षाच्या युवा सेनेतर्फे शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन

जाहिरात

 

भाजपचे 1431 ठराव ! गोकुळच्या संचालक मंडळात भाजपच मोठा भाऊ !! खासदार धनंजय महाडिक

schedule29 Jun 26 person by visibility 380 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक योजनेसाठी ठराव दाखल करण्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने शक्ती प्रदर्शन केले. कसबा बावडा रोडवरील महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित ठरावधारकांच्या मेळाव्यात बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपकडील 1431 ठरावाची यादी घोषित केले. महायुती म्हणूनच गोकुळची निवडणूक लढवली जाईल असे स्पष्ट करताना ठरावांची संख्या  कोणाकडे कितीही असले तरी संचालक मंडळात भारतीय जनता पक्ष हाच मोठा भाऊ असेल असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
 माजी आमदार महादेवराव महाडिक, गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला. अरुण नरके गटाने गोकुळच्या  निवडणुकीसाठी भाजप सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मेळाव्याला प्रारंभ झाला. शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंग घाटगे, आमदार शिवाजीराव पाटील , माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार संजय घाटगे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष व गोकुळच्या संचालिका शोमिका महाडिक, गोकुळचे संचालक चेतन नरके , अंबरीश घाटगे, माजी संचालक विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, दीपक पाटील, आजऱ्याचे अशोक चराटी, महापौर रुपाराणी निकम आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला.
 खासदार धनंजय महाडिक यांनी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीचा दाखला देत गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढवायची आहे असे स्पष्ट केले. महायुती अंतर्गत घटक पक्षातर्फे स्वतंत्रपणे ठराव दाखल केले जात आहेत. ठरावांच्या संख्येवरून कोण मोठा भाऊ, कोण लहान भाऊ सांगितले जात आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना 1971 ठराव असल्याचे सांगितले .मात्र त्यामध्ये यड्रावकर गटाचे दीडशेहून अधिक ठराव आहेत. कुपेकर गटाचे ठराव आहेत. ठरावांची बेरीज करायला सुरुवात झाली तर जनसुराज्य शक्ती पक्षी भाजप सोबत आहे . त्यांचे ठराव आहेत. याशिवाय आणखी काही ठराव तशमिळणार आहेत . कोणाचे किती ठराव जरी असले तरी संचालक मंडळात भारतीय जनता पक्ष हाच मोठा भाऊ राहील असे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.
 'अरुण नरके गटाची भारतीय जनता पक्षाला सोबत लाभल्यामुळे या निवडणुकीत भाजपची ताकद वाढली आहे तर काँग्रेसची ताकद कमी झाली' असा टोलाही खासदार महाडिक यांनी लगावला. समरजीतसिंह घाटगे यांनी गोकुळ दूध संघाचा कारभार करताना शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून काम झाले पाहिजे. गोकुळ समोर अमूलचे मोठे आव्हान आहे. कोणत्याही सहकारी संस्थेमध्ये गरजेपेक्षा जास्त राजकारण आले तर संस्था अडचणी येतात असे स्पष्ट केले. संचालिका शौमिका महाडिक म्हणाल्या , आमच्याकडून जे ठराव दाखल होणार आहेत. त्यामध्ये एक ही संस्था अवसायानातील नाही. कुठल्याही संस्थेची चौकशी सुरू नाही. गेली पाच वर्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष केला. या निवडणुकीत सगळ्यांनी एकत्र येऊन ताकद वाढवायचे आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे. सहकार चळवळ मोठे करूया. संचालक अंबरीश घाटगे यांनी गोकुळला पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या. या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक व गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके एकत्र आले आहेत. महायुती पॅनेलचा विजय निश्चित आहे. गोकुळला पुन्हा एकदा गतवैभव लाभेल इतके नक्की. भारतीय जनता पक्ष ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. आमचा पक्ष कार्यकर्त्यांच्यावर चालतो, नोकरदारांच्यावर नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. तसेच त्यांनी गेल्या पाच वर्षात गोकुळमध्ये दुय्यम वागणूक दिल्याचेही सांगितले. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी गोकुळची निवडणूक साऱ्याने एकत्र येऊन लढायचे व जिंकायचे असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले .भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांनी आभार मानले. व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती सावकार मादनाईक, केरबा चौगुले,  प्रकाश चव्हाण,  प्रवीणसिंह पाटील, गडहिंग्लजच्या  माजी नराध्यक्ष स्वाती कोरी, पद्मजा आपटे शिवशंकर हत्तरकी, प्रताप पाटील कावणेकर , रघुनाथ पाटील, हेमंत कोलेकर , रामचंद्र भोगम,  विजय भोजे, उमेश आपटे, शेतकरी संघाचे अध्यक्ष  दत्ता राणे आदी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes