विधान परिषदेसाठी भाजपकडून अकरा उमेदवारांची यादी जाहीर
schedule31 May 26 person by visibility 35 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : विधान परिषदेसाठी भारतीय जनता पक्षातर्फे 11 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.रविवारी रात्री ही यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये सोलापुरातून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर झाली. सांगली - सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून धैर्यशील कदम यांना उमेदवारी मिळाली. नागपूर विधान परिषदेसाठी डॉ. राजीव पोतदार यांना तिकीट जाहीर झाले आहे. भंडारा-गोंदियातून अविनाश ब्रह्मणकरांना तर अमरावतीतून प्रवीण पोटे पाटलांना उमेदवारी मिळाली आहे. नांदेड येथून अमर राजूरकर तर अहिल्यानगरमधून अपेक्षेप्रमाणे प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी मिळाली. धाराशिव - बीडमधून बसवराज पाटील यांना तर जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी मिळाली आहे. वर्धा- चंद्रपूर- गडचिरोली अरुण लखाणी यांना उमेदवारी मिळाली. संभाजीनगर -जालना विधान परिषद मतदार संघातून सुहास शिरसाठ यांना उमेदवारी मिळाली