महापालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून ७० कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नती
schedule30 May 26 person by visibility 9 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून विविध विभागातील ७० कर्मचाऱ्यांना मुकादम पदावर पदोन्नती देण्यात आली. वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांना मुकादम पदासाठी पदोन्नती देण्याचे आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी काढले. शिपाई, पवडी कामागर, झाडू कामगार, सफाई कामगार व पहारेकरी या संवर्गातून या पदोन्नत्या करण्यात आल्या. यातील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती आदेश स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कर्मचारी संघाचे मुख्य संघटक संजय भोसले, अध्यक्ष दिनकर आवळे व कर्मचारी उपस्थित होते. तसेच सेवानिवृत्त २९ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला