Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सोशल मीडियावर गोकुळची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, कर्मचाऱ्यांची मागणी महापालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून ७० कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नतीआयकर कायदा २०२५ च्या नव्या पर्वाचे ‘पुनर्मंथन’ कोल्हापुरात, शनिवारी - रविवारी राष्ट्रीय परिषदराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्सची स्थापना, नऊ सदस्यीय समितीत कुलगुरू डॉ. आर. के. कामतचप्पल निर्मितीची प्रक्रिया उलगडणाऱ्या ‘द कोल्हापुरी’ पुस्तकाला अकरा पुरस्कार मेघराज भोसले यांच्या समर्थ पॅनेल विरोधात चित्रकर्मी पॅनेल, अपक्षांची संख्याही मोठी मंत्री चंद्रकांत पाटलांची संकल्पना, कोल्हापुरात हितैषी कौन्सिलिंग सेंटरची स्थापनानिर्माता गटात आठ, दिग्दर्शक गटातून नऊ उमेदवार ! अभिनेता गटात पाच जणांमध्ये लढत ! !केआयटीच्यावतीने नूतन कुलगुरू आर के कामत यांचे स्वागत डीवायपी पॉलिटेक्निकचा  योगेश घुले ठरला गुगल स्टुडन्ट अँबेसिडर

जाहिरात

 

सोशल मीडियावर गोकुळची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, कर्मचाऱ्यांची मागणी

schedule30 May 26 person by visibility 9 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची सोशल मीडियावरील बदनामी थांबवावी.संस्थेची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी. गोकुळची बदनामी झाल्यास त्याचा परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होतो.’ अशी मागणी गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी केली. प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रीक यांना कर्मचाऱ्यांनी मागणीचे निवेदन दिले. कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सुद्रीक यांनी, शनिवारी ३० मे २०२६ रोजी प्रशासकीय मंडळाची बैठक आहे. त्यामध्ये चर्चा करू असे सांगितले. कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सदाशिव निकम, संदेश पाटील, योगेश चव्हाण, प्रकाश आडनाईक, बोर्ड सचिव प्रदीप पाटील, रमेश पाटील, शिवानंद शिरहट्टी, प्रवीण करडे, ओमकार पाटील, बाजीराव राणे, संग्राम मगदूम, रामचंद्र पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes