शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण-ऑनलाईन शिक्षण केंद्राला उत्कृष्टता पुरस्कार
schedule30 Sep 24 person by visibility 114 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राला इंडिया एम्प्लॉयर फोरम आणि इंडिया एज्युकेशन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा उच्च शिक्षणातील उत्कृष्ट पुरस्कार -२०२४ प्राप्त झाला आहे.हा पुरस्कार पटना येथील भारतीय प्रोद्योगिकी संस्थान निदेशकप्रा.टी.एन.सिंह यांच्या हस्ते संचालक डॉ.कृष्णा पाटील व उपकुलसचिव व्ही.बी.शिंदे यांनी स्वीकारला.
दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील शैक्षणिक आणि प्रशासकीय गुणवत्तापूर्ण होणाऱ्या बदलाबाबत दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.विविध अभ्यासक्रमातील कौशल्याभिमुख व रोजगाराभिमुख झालेले बदल,तसेच विद्यार्थी,गृहिणी,कामगार, उद्योजक,शेतकरी.कामगार, नोकरदार आणि स्पर्धा परीक्षा देवू इच्छीणाऱ्यासाठी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र कार्यरत आहे.
यासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दुहेरी पदवीची सोय, दुर्गम भागासह ८६ अभ्यास केंद्रांची सोय,दर्जेदार स्वयं अध्ययन साहित्य,व्हिडीओ लेक्चर्स,सेट नेट सारख्या परीक्षा बाबत उद्बोधन वर्गाचे आयोजन शिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि विकासच्या संधी बरोबर प्लेसमेंट च्या ही सुविधा दिली जाते. यातून अनेकांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त होते व नोकरी करीत असताना पदोन्नतीसाठी ही या अभ्यासक्रमाचा लाभ होतो. विशेष म्हणजे दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र उच्च शिक्षणातील उत्कृष्ट पुरस्कार -२०२४ प्राप्त करणारे एकमेवाद्वितीय केंद्र आहे.
......................
“ दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र शिक्षणापासून वंचित असणाऱ्या घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक वर्षापासून अविरतपणे कार्यरत आहे. उच्च शिक्षणातील उत्कृष्ट पुरस्कार - २०२४ हा या कामाची पोहोच पावती आहे.सध्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने सुरु असलेला ऑनलाईन एम.बी.ए.व इतर सुरु होणारे ऑनलाईन अभ्यासक्रम यांच्यासाठी निश्चित उभारी देणारी बाब आहे.”
- डॉ.डी.टी.शिर्के कुलगुरू