Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक मतदार संघातील उमेदवार प्रफुल्ल तारेंचा प्रा.जयंत आसगावकरांना पाठिंबाकेडीसीसी बँकेसाठी आता काय करायला पाहिजे हे मुश्रीफांनी ठरवावे- सतेज पाटलांचा मर्मभेदी टोलानातवाच्या निवडणुकीसाठी आजोबांचा प्रचाराचा झंझावातराहुल पाटलांचा विजय…पीएन गटाला बळ !प्रामाणिक कामाला विजयाचे तोरण...!कौस्तुभ गावडेंच्या प्रचारासाठी साताऱ्यात शिक्षक सरसावले ! गृहभेटी वैयक्तिक संपर्काद्वारे प्रचारावर भर !!कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात, मिरवणुकीतून कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन आमदार म्हणून शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी प्रामाणिकपणाने लढा दिला -: प्रा. जयंत आसगावकरतततइतिहास घडणार, शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे सर्वात तरुण आमदार ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

केडीसीसी बँकेसाठी आता काय करायला पाहिजे हे मुश्रीफांनी ठरवावे- सतेज पाटलांचा मर्मभेदी टोला

schedule21 Oct 26 person by visibility 245 categoryराजकीय

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ' गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीकडे चार हजार चारशे ठराव आहेत असे नेते मंडळी सांगत होते. मग मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाविरुद्ध षडयंत्र कोणी रचले?  मंत्री  मुश्रीफ यांची संशयाची सुई महायुतीच्या नेते मंडळी भोवतीच फिरत आहे. मुश्रीफ यांनी आत्मचिंतन करावे आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी संदर्भात काय करायला पाहिजे ?  हे त्यांनी ठरवावे.' असा मर्मभेदी टोला काँग्रेसचे नेते व आमदार सतेज पाटील यांनी लगावला.
गोकुळ निवडणुकीच्या निकालानंतर मंत्री मुश्रीफ यांनी चिरंजीव नवीद मुश्रीफ यांच्या पराभवावर बोलताना माझ्या मुलाविरुद्ध षड्यंत्र रचले  गेले असा आरोप केला. त्या आरोपाच्या अनुषंगाने आमदार सतेज पाटील म्हणाले,  गोकुळ निवडणुकीच्या अगोदर महायुतीतील सारे नेतेमंडळी आमच्याकडे चार हजार चारशे ठराव आहेत असे सांगत होते. मग मंत्री मुश्रीफ यांच्या मुलाविरुद्ध षडयंत्र कोणी रचले ? हे त्यांनी तपासून पाहावे. आता तर केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. मंत्री मुश्रीफ यांनी जो आरोप केला आहे त्यानुसार त्यांच्या आरोपाच्या संशयाची सुई महायुतीतील नेते मंडळींच्या भोवतीच फिरत आहे . समविचारी आघाडी म्हणून मी माझ्या पॅनेलमधील सगळ्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करणार हे निश्चित आहे मग महायुतीमध्ये कोणी कोणावर षड्यंत्र रचले हे त्यांनी आत्मचिंतन करावे.'
गोकुळ दूध संघाच्या नूतन चेअरमनांची निवड 29 ऑक्टोबर रोजी 2026 रोजी होण्याची शक्यता असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes