अशोक उबाळेंनी स्वीकारला अतिरिक्त कार्यभार
schedule10 Jul 23 person by visibility 1918 categoryसंपादकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर विभागीय (उच्च शिक्षण) शिक्षण सहसंचालकाचा अतिरिक्त कार्यभार डॉक्टर अशोक उबाळे यांनी सोमवारी (१० जुलै) स्वीकारला. उबाळे यांच्याकडे दुसऱ्यांदा शिक्षण संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. यापूर्वी त्याने डिसेंबर २०१९ ते जुलै २०२१ या कालावधीत कोल्हापूर विभागाचे शिक्षण सहसंचालकपद सांभाळले होते.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या आठवड्यात शिक्षण सहसंचालक कार्यालयावर छापा टाकून तीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. यामध्ये शिक्षण सहसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे डॉ हेमंत कटरे, व कनिष्ठ लिपिक अनिल जोंग, प्रविण गुरव यांना अटक केली होती. लाचखोरी प्रकरणात सापडल्यामुळे डॉ. कटरे यांच्याकडे शिक्षण सहसंचालकाचा अतिरिक्त कार्यभार शिक्षण विभागाने संपुष्टात आणला होता. आणि या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. अशोक उबाळे यांच्याकडे देण्यात आला. उबाळे यांनी सोमवारी यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. तर कटरे यांना त्यांच्या मूळ जागी म्हणजे राजाराम कॉलेज येथे सहयोगी प्राध्यापक पदावर पाठविण्यात आले.