शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी अर्जुन पाटील, उपाध्यक्षपदी पद्मजा मेढे
schedule15 Jul 22 person by visibility 699 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची मुख्य आर्थिक संस्था समजल्या जाणाऱ्या दि प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी अर्जुन दिनकर पाटील तर उपाध्यक्षपदी पद्मजा तानाजी मेढे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर होताच बँक परिसरात समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.
बँकेत तेरा वर्षांनी सत्तांतर घडले आहे. शिक्षक समिती, शिक्षक संघ थोरात गट, कास्ट्राईब, शिक्षक भारती आणि जुनी पेन्शन संघटना यांनी एकत्र येत ‘राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडी’ची स्थापना केली होती. शाहू आघाडीने १७ पैकी १७ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. सत्तांतरानंतर पहिल्यांदा शिक्षक बँकेचे अध्यक्षपद शिक्षक समितीला मिळाले आहे तर उपाध्यक्षपद शिक्षक संघ थोरात गटाकडे आहे.
नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बुधवारी आणि गुरुवारी सुकाणू समितीच्या बैठका झाल्या. सुकाणू समितीच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी नावे निश्चित केली होती.
दरम्यान शुक्रवारी (ता.१५ जुलै) झालेल्या संचालकांच्या बैठकीत निवड प्रक्रिया पूर्ण झाली. अध्यक्षपदासाठी अर्जुन पाटील यांच्या उमेदवारीसाठी एस.व्ही.पाटील हे सूचक तर बाळासाहेब निंबाळकर अनुमोदक होते. उपाध्यक्षपदासाठी पद्मजा मेढे यांच्या नावाला हे राजेंद्र पाटील सूचक तर वर्षा केनवडेअनुमोदक होते. संचालक अमर वरुटे, शिवाजी रोडे-पाटील, सुनील ऐडके,, बाळकृष्ण हळदकर, नंदकुमार वाईंगडे, गजानन कांबळे, शिवाजी बोलके, बाबू परीट, रामदास झेंडे, सुरेश कोळी, गौतम वर्धन आदी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष पाटील व उपाध्यक्ष मेढे या बँकेवर पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करत आहेत.
दरम्यान निवडीनंतर नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सुकाणू समितीचे जोतिराम पाटील, रवीकुमार पाटील, सुनील पाटील, प्रमोद तौंदकर, विलास चौगुले, रघुनाथ खोत, आनंदा जाधव, बाजीराव पाटील, बाळासाहेब पोवार, बाजीराव पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे चेअरमन राजीव परीट आदी उपस्थित होते.