रविकिरण इंगवलेंचे आमदारपुत्रावर आरोप, ऋतुराज क्षीरसागरांचाही पलटवार
schedule04 Jun 26 person by visibility 44 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव व नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्यावर आरोप केले. इंगवले यांनी पत्रकार परिषद घेत, ऋतुराज क्षीरसागर हे कॅसिनोमध्ये जाऊन जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ दाखविला. लोकप्रतिनिधी जर जुगार खेळत असतील तर नवीन पिढीचे भवितव्य काय ? असा सवाल करत इंगवले यांनी क्षीरसागर पिता –पुत्रावर टिकास्त्र सोडले. टक्केवारीच्या माध्यमातून मिळवलेल्या पैशाच्या बळावर आमदारपुत्र पैसे उधळत असल्याचा आरोप इंगवले यांनी केला. पंधरा ते वीस दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान इंगवले यांनी केलेल्या टीकेवर नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी पलटवार केला आहे. नगरसेवक क्षीरसागर म्हणाले, ‘इंगवले यांनी वैयक्तिक आरोपांची मर्यादा ओलांडली. त्यांनी, विधानसभा निवडणुकीपूर्वी क्षीरसागर कुटुंबींयावर बेछूट केले आरोप केले. आमदार राजेश क्षीरसागर यांना बदनाम करण्याचा प्रकार केला. महापालिका निवडणुकीत आमच्याविरोधात पत्रकबाजी केली. ऑडिओ क्लिप फिरवले. आताच्या त्यांच्यापत्रकार परिषदेला मी फार महत्व देत नाही. बदनामीच्या षडयंत्राला भीक घालत नाही. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. त्यांच्या आरोपावर कायदेशीर कारवाई करता येईल यासंबंधी कायदेशीर सल्ला घेत आहे. त्यानंतर पुढची दिशा ठरवेन.’