सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामकाजामुळे हजारो सभासद मतदानापासून वंचित, चित्रपट महामंडळात परिवर्तन गरजेचे
schedule03 Jun 26 person by visibility 20 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात गेल्या दहा वर्षात सत्तेचे राजकारण सुरू आहे. विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सत्तेत टिकून राहण्यासाठी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या आहेत. यामुळे हजारो सभासद मतदानापासून वंचित राहिले. कामगारांच्या पेन्शन बंद झाल्या. चित्रपट महामंडळाला अनुदानातून मिळणारे रक्कम थांबले. महामंडळाचे कामकाज ठप्प झाल्यासारखी स्थिती आहे. हे चित्र बदलण्यासाठी महामंडळात सत्ता परिवर्तन गरजेचे आहे. महामंडळाला गतवैभव मिळवून देण्यासाठी चित्रकर्मी पॅनेलला साथ द्या.’अशी साद उमेदवारांनी घातली.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक सात जून रोजी होत आहे. निवडणूक प्रचारार्थ चित्रकर्मी पॅनेलतर्फे सभासदांचा मेळावा झाला. गायन समाज देवल क्लब येथील सभागृहात हा मेळावा पार पडला. ‘चित्रपट महामंडळ हे कलाकारांचे आहे, ते राजकीय महत्वाकांक्षा साध्य करण्याचे व्यासपीठ नाही’अशा शब्दांत मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या. सभासद कामगारांसाठी मेडिक्लेम, निर्मात्यांना प्रोत्साहन देणारे धोरण, कलाकारांसाठी फिल्म बझार संकल्पना, चित्रपट महोत्सव अशा विविध पातळीवर चित्रकर्मी पॅनेल काम करेल. आणि ज्या सभासदांना मतदानाचा हक्क मिळाला नाही त्यांना मतदानाचा अधिकार मिळवून देऊ अशी ग्वाही दिली.
महामंडळाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या अभिनेत्री वर्षा ऊसगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिनेत्री ऊसगावकर यांनी, चित्रकर्मी पॅनेलला सभासदांनी साथ द्यावी. निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. महामंडळात राजकारण करणारे नव्हे तर सभासद, कामगार, कलाकार, निर्माते यांच्यासाठी काम करणारे प्रतिनिधी निवडा.’असे आवाहन केले.
अभिनेते विजय पाटकर यांनी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्यावर निशाणा साधला. चित्रपट महामंडळ वाचविण्यासाठी सत्ता परिवर्तन गरजेचे आहे असे सांगितले. उमेदवार व दिग्दर्शक सतीश रणदिवे यांनी चित्रपट महामंडळाला मोठा वारसा लाभला आहे. तो वारसा टिकवून ठेवण्यासाठी आणि महामंडळाला गतवैभव मिळवून देण्यासाठी चित्रकर्मी पॅनेलची लढाई आहे. सभासदांनी पाठिंबा द्यावा असे नमूद केले. उमेदवार व अभिनेता आनंद काळे यांनी सत्ताधारी समर्थ पॅनेलवर टीकास्त्र सोडले. केवळ सत्तेसाठी समर्थ पॅनेल सभासदांची दिशाभूल करत आहे. सत्ताधाऱ्यांच्या घोटाळयामुळे महामंडळ बदनाम झाले गेल्या दहा वर्षात त्यांनी सभासद हितासाठी काय केले ?असा सवाल त्यांनी केला. चित्रकर्मी पॅनेलचे सगळेच उमेदवार हे चित्रपट व्यवसायांशी निगडीत आहेत. महामंडळाच्या विकासाचे व्हिजन डोळयासमोर ठेवून आम्ही काम करू.अशी ग्वाही काळे यांनी दिली. उमेदवार पितांबळ काळे, सदानंद सुर्यवंशी, विजय राणे आदींची भाषणे झाली. याप्रसंगी उमेदवार गणेश तळेकर, विजय शिंदे, रणजीत जाधव, सतीश बीडकर, महेश देशपांडे, मिलिंद अष्टेकर, निलेश बुटटे, प्रकाश जाधव, अनिल सुतार आदी उपस्थित होते.