Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संमेलन शाहू कार्य संवर्धनाचे !  निर्धार शाहू विचारांची ‘झेन झी’पिढी घडविण्याचे ! !जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या तज्ञसंचालकपदी  स्वप्निल घस्तेजागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उद्योजकांचा सन्मान, प्रशिक्षणर्थींना प्रमाणपत्र वितरण उत्साहातगुणीदास फाऊंडेशने घडविली ‘तीर्थ विठ्ठल’मधून अभंग -भक्तीसंगीताची वारीराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे कागलमध्ये जनसेवा सप्ताहतंर्गत उपक्रमकोल्हापुरात साहित्यिक, प्राध्यापक- शिक्षकांनी उगारली सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात निषेधाची मूठगोकुळतर्फे वारकऱ्यांना सुगंधी दुधाचे वाटप, पुईखडी परिसरात स्वच्छता मोहीमसोहळा भक्तीचा…भाव सेवेचा !धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, अखेर सरकार नमलेकोल्हापुरातील कवी - लेखक - प्राध्यापक – शिक्षक एकवटले, शनिवारी करणार धरणे आंदोलन ! जंतरमंतरवरील तरुणांचे वाढविणार मनोबल!

जाहिरात

 

गंगावेश तालमीचे रखडलेले काम मार्गी लावू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महाराष्ट्र कस्ती संघटनेला ग्वाही

schedule04 Jun 26 person by visibility 228 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी, कोल्हापुरातील श्री शाहू विजयी गंगावेश तालीमच्या बांधकामासह अन्य अत्यावश्यक उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी केली. गंगावेश ताालीम व महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्यावतीने निवेदन दिले. 

तालमीतील पैलवानांना वसतीगृह, मॅट हॉल, जिम हॉल इत्यादी आवश्यक साधनसामग्री व शासकीय मदत उपलब्ध व्हावी.  तसेच महाराष्ट्रातील इतर गरजू व ऐतिहासिक तालमींनाही क्रीडा विभागामार्फत आवश्यक मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना उपमुख्यमत्री पवार यांनी,  ,‘दिवंग्जगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द नक्की पूर्ण करू. श्री शाहू विजयी गंगावेस तालमीचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी सरकारीस्तरावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील.” अशी ग्वाही दिली..

शिष्टमंडळात महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे प्रमुख पै. संग्राम कांबळे, युवा महाराष्ट्र केसरी पै. अक्षय गरुड, उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर, उपमहाराष्ट्र केसरी पै. जयदीप पाटील, डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील, हिंदकेसरी पै. संतोष वेताळ, पै. सुभेदार उत्तम पाटील, गंगावेस तालमीचे अध्यक्ष दीपक जाधव, उपाध्यक्ष राहुल जानवेकर, अभिजित पाटील, महेश चव्हाण, शिवराज मोरे, पै. इमरान मुजावर, संतोष बोधले, पै. जितेंद्र भगत, पै. अमित पिंगळे, पै. सयाजी कोळेकर , रणजीत मुळीक आदींचा समावेश होता. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes