Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी संपत पाटील, अमोल माने भाव सेवेचा - काम राष्ट्रव्यापी ! साथी भरत लाटकरांच्या आठवणींनी डबडबले डोळे... गहिवरली मने !!वकिलांच्या सुरक्षेसाठी विधेयक,  बार असोसिएशनतर्फे आमदार राजेश क्षीरसागरांचे आभारआंतरभारती शिक्षण मंडळ करणार महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात कोल्हापूरच्या कलाकारांचा सहभागफेरीवाल्यांचा सोमवारी महापालिकेवर मोर्चाकर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंबंधी विद्यापीठ प्रशासनासोबत कास्ट्राइब संघटनेची बैठकसर्व स्वयंसेवी संस्थांना सीएसआर निधी मिळावा; राज्यस्तरीय समन्वय प्राधिकरण स्थापण्याची मागणी आंदोलनावरुन आंदोलन, गोकुळ आवारातून कर्मचाऱ्यांनी केले वांगचूकांचे समर्थन,  भाजपाचा जोरदार आक्षेपशक्तीपीठ रद्द करा, अन्यथा जनताच सरकारचा शक्तीपात करेल ! पंढरपुरात संघर्ष समितीतर्फे सद्बुद्धी दिंडी ! !

जाहिरात

 

सतेज - ऋतू केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा रविवारी , प्रथम क्रमांकाचे बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टर

schedule04 Jun 26 person by visibility 1033 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : बेंदूर सणानिमित्त व माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सतेज - ऋतू केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन सात जून 2026 रोजी करण्यात आले आहे करवीर तालुक्यातील हिंदकेसरी नेर्ली  मळा येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला महिंद्रा ट्रॅक्टर 575 देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती संयोजन समितीतील व पाचगावचे माजी उपसरपंच नारायण गाडगीळ व गोकुळचे संचालक प्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
अ गट, ब गट, दुस्सा चौसा,   आदत गट अशा चार गटात स्पर्धा होणार आहे. अ गटातील स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला देण्यात येणारे महिंद्रा ट्रॅक्टर 575 बक्षीस आमदार सतेज पाटील व माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहे.  स्पर्धेतील द्वितीय क्रमांकासाठी दोन बुलेट गाडी बक्षीस आहेत तर तृतीय क्रमांकासाठी दोन होंडा यूनिकॉर्न गाडी आहेत.  ब गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला शाईन गाडी, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला स्प्लेंडर गाडी व तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला एचएफ डीलक्स गाडी हे बक्षीस आहे.
हिंदकेसरी नेर्ली मळा येथे सकाळी नऊ वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. ही स्पर्धा पाहण्यासाठी बैलगाडी शर्यत शौकिनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान संयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे सदस्य संग्राम पाटील, हमु पाटील, सागर पाटील, गजानन पाटील, पृथ्वीराज पाटील, सर्जेराव पाटील, आदी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes