Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डीवाय पाटील अभियांत्रिकी केमिकलच्या ५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पदग्रहण सोहळा शनिवारी मुंबईत, केंद्रीयमंत्री, मुख्यमंत्र्यांची उपस्थितीवार्षिक तपासणीवेळी प्रत्येक मुख्याध्यापकाकडे शाळेची यशोगाथा हवी ;  सहविचार सभेत उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केली १७ विषयांवर चर्चादिवा विझला कायमचा….शिक्षक पात्रता परीक्षा होणार ऑनलाइन ! राज्य परीक्षा परिषदेचे आयबीपीएसला पत्र ! !उद्योगांनी नावीन्य - गुणवत्ता - आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनावे - खासदार धनंजय महाडिकमहादेव डावरे यांचे कार्य  शिक्षकांना दिशादर्शक : भरत रसाळेमहिला - बाल कल्याण देणार मशरुम-आटाविरहीत व्हीट ब्रेड तयारचे प्रशिक्षणडॉ. संजय डी. पाटील यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्रदानगोकुळच्या माजी चेअरमनांची टोलेबाजी ! जुळे भाऊपासून बापापर्यंत उपमा, जिल्ह्यातील नेत्यांचाही चिमटा ! !

जाहिरात

 

डीवाय पाटील अभियांत्रिकी केमिकलच्या ५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट

schedule03 Jul 26 person by visibility 20 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूरडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी , कसबा बावडा येथील केमिकल इंजिनिअरिंग विभागातील ५५ विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्याना वार्षिक .५० लाख रुपयापर्यंत पॅकेज मिळाले आहे

एकूण १८ आघाडीच्या कंपन्यांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याना प्लेसमेंट मिळाली आहे. यामध्ये मुंबईस्थित टेक्निमोंट आयसीबी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये किरण ढेरे याची वार्षिक .५० लाख रुपये पॅकेजवर निवड झाली  आहे. तसेच सोलर ग्रुप लिमिटेड, नागपूर येथे सहा विद्यार्थ्यांची .५० लाख रुपये वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे.

कार्यकारी संचालक डॉ. . के. गुप्ता  म्हणालेसंस्थेकडून  दिले जाणारे उद्योगाभिमुख शिक्षण, तांत्रिक प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स आणि मुलाखतपूर्व तयारीचे विशेष मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील असून त्याचा सकारात्मक परिणाम प्लेसमेंटमध्ये दिसून आलाया विद्यार्थ्यांना अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, केमिकल विभागप्रमुख डॉ.के.टी.जाधव, प्लेसमेंट समन्वयक, ट्रेनिंग समन्वयक तसेच सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, सी. एचआरओ श्रीलेखा साटमप्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, विभागप्रमुख डॉ.के.टी.जाधवयांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes