पुणे पदवीधरमधून भैया मानेंची माघार
schedule09 Oct 26 person by visibility 187 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: ‘पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भेया माने यांनी माघार घेतली आहे. माने यांनी महायुतीकडून निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली होती. मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. दरम्यान महायुतीमध्ये पदवीधरची जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली आहे. भाजपकडून पुणे पदवीधरसाठी डॉ. स्मिता योगेश जाधव यांची उमेदवारी घोषित केली आहे. महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे माने यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करत अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. पुणे पदवीधरसाठी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत दहा ऑक्टोबरपर्यत होती. माने यांनी सकाळी कागल येथील कॉलेजमध्ये बैठक घेतली. त्यामध्ये माघारीचा निर्णय झाला.