Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळसाठी दोन्ही आघाड्यांना चिन्हांचे वाटप ! ठरावधारकांना रविवारपासून सहलीवर पाठवण्याचेही नियोजन !!पुणे पदवीधरमधून भैया मानेंची माघारकार्यकर्त्यांची गर्दी….ओसांडणारा उत्साह अन् सतेज पाटलांची शशिकांत पाटील चुयेकरांना चेअरमन करण्याची घोषणामान्यवरांशी संवाद, भेटीगाठीद्वारे कौस्तुभ गावडेंचा प्रचारावर भरमहायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा, नेते अन उमेदवारांच्या उपस्थितीत घोषणासमविचारी आघाडीतर्फे उमेदवारांची घोषणा, सात संचालकाना पुन्हा उमेदवारीगोकुळसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, तीन माजी चेअरमन, बारा संचालकांना उमेदवारी  पदवीधरांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करणार हर्षदा देशमुख -जाधवराधानगरीत राष्ट्रवादीत फूट, प्रा. किसन चौगले  काँग्रेसकडे ! समविचारी आघाडीतून उमेदवारी ! !नाना आगळा - नाना वेगळा…नाना जीवाभावाचा !!

जाहिरात

 

गोकुळसाठी दोन्ही आघाड्यांना चिन्हांचे वाटप ! ठरावधारकांना रविवारपासून सहलीवर पाठवण्याचेही नियोजन !!

schedule09 Oct 26 person by visibility 71 category

महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरू आहे. दोन्ही आघाड्याने पॅनल आणि उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता प्रचारावर भर देण्यात आला आहे महायुतीतर्फे रविवारी महासैनिक दरबार हॉल येथे प्रचार मेळावा आयोजित केला आहे तर महाविकास आघाडी प्रणित समविचारी आघाडीतर्फे स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून रविवारपासूनच प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. दोन्ही बाजूने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर सहलीचा बेत आहे. जास्तीत जास्त ठरावधारक आपल्या बाजूने राहावेत यासाठी नियोजन केले. ठरावधारकांना  रविवारपासून सहलीवर पाठवण्याचे नियोजित आहे. जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक यांना सोबत पाठविले जाणार आहे. प्रत्येकांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. 25 जागेसाठी पन्नास उमेदवार रिंगणात आहेत. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीच्या पॅनेलला चिन्हांचे वाटप झाले. महायुतीच्या राजषीॅ शाहू शेतकरी विकास आघाडीला कपबशी हे चिन्ह मिळाले तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes