+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसांगोलानजीक अपघात, नांदणीचे दोघे ठार adjustपन्हाळगडावर उभारणार शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, कोल्हापूरच्या शिल्पकारांकडे काम adjustकोल्हापूर उत्तर तर जिंकणारच, दक्षिणचा आमदारही शिवसेना ठरविणार – राजेश क्षीरसागर adjustगोशिमातर्फे स्वच्छता अभियान, तीन गटात विजेते निवडणार adjustमारुती माळींना जीवनगौरव, शरद माळींना समाजभूषण पुरस्कार ! १३ ऑक्टोबरला वितरण !! adjustइलेक्शन आले डोक्यावरी, सुरु करा गाजराची शेती! काव्यांगणात शब्दांचे निखारे !! adjustसत्यजित कदमांनी शहरात पायाभूत सुविधांचे जाळे विणले-खासदार धनंजय महाडिक adjustसतेज पाटील वारकऱ्यांच्या वेशभूषेत, कर्मयोगी महानाट्यात सहभाग adjustदिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर adjustगणवेश बिलासाठी ८० हजाराचा डल्ला, महामंडळाच्या समन्वयकासह दोघे पोलिसांच्या जाळयात
1001041945
1000995296
1000926502
schedule20 Sep 24 person by visibility 88 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन  प्रतिनिधी, कोल्हापूर : कागल ते पेठनाका दरम्यानच्या रस्त्यावर भुयारी मार्गाचे व सेवा रस्त्यांचे काम नव्याने समाविष्ट करून त्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली .
 शेतकरी, शालेय विद्यार्थी व नागरिक यांनी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची मागणी केली होती.यावेळी खासदार माने यांनी संबंधित रस्त्याची पाहणी विद्यार्थी , शेतकरी, नागरिक यांच्या समवेत केली होती .यावेळी सदर मागणी उचित असल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याची सूचना त्यांनी दिली होती. दरम्यान,कामासाठी त्यांनी  रस्ते व दळणवळणमंत्री  नितीन गडकरी यांच्याकडे खासदार माने यांनी नवीन कामे समाविष्ट करण्याबाबत मागणी करून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.अखेर खासदार माने यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले.
          यामध्ये शिरोली येथील शिरोली शाळा ते महाडीक बंगला येथे नवोन भुयारा मार्ग, मंगरायाचीवाडी येथील भुयारी मार्गाचा उंची व रुदी वाढविण्यास मजुरी, किणी हायस्कूल ते माळी वसाहत नवीन भुयारा मार्ग, घुणकी येथे वारणा नदीच्या पुराचे पाणी पास होण्यासाठी पूर्वीचे तोन व नवीन तीन वॉटर अंडरपासचे मंजुरी,त्याचबरोबर घुणका ओढ्याच्या पुलापासून महामार्गाच्या दोन्ही बाजूस शेतकऱ्यांच्या शेतीमाल व ऊस वाहतुकीसाठी नवीन वारणा नदी पुलापर्यंत नवीन सेवा रस्ता , कणेगाव फाटा येथे नवीन बायपास रस्ता त्याचप्रमाणे गोकुळ शिरगाव येथील छोटा भुयारी मार्ग तर उजळाईवाडी व सरनोबतवाडी येथील नवीन बायपास मार्गास नव्याने मंजुरी मिळाली असल्याची माहिती खासदार माने यांनी दिली.