Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डाॅ.दिग्विजय पवार यांचा मलेशियात पुरस्काराने गौरवविजय टिपुगडे यांच्या चित्रांचे तरंगायन प्रदर्शन शनिवारपासूनकोरे अभियांत्रिकीच्या पीबीएल प्रदर्शनात २३००  विद्यार्थ्यांचे ३५० प्रकल्पांचे सादरीकरणचेअरमन झाले, पण फेटा नाही बांधला…! नेत्याच्या आठवणीने राजेश पाटील भावूक ! !खासदार धैर्यशील मानेंनी साजरी केली वाडयावस्तीवरील लोकांसोबत दिवाळीजिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन मुख्याध्यापक शिक्षण- क्रीडा समितीवर सदस्ययशवंत ब्रिगेड-कोळेकर परिवाराची दिपावलीत सामाजिक बांधिलकी आधार प्रमाणीकरण नसलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धारावेत – प्रसाद पाटीलगोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांना मिळावा मतदानाचा अधिकार - राजू मानेगोकुळच्या चेअरमनपदी राजेश पाटील ! महायुतीचा सतेज पाटलांना धक्का, शशिकांत पाटील पराभूत !!

जाहिरात

 

रंगकर्मींचे भर पावसात आंदोलन, खाजगीकरणाच्या विरोधात बरसल्या घोषणा

schedule28 Jul 26 person by visibility 513 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह खाजगीकरणाच्या विरोधात मंगळवारी रंगकर्म मोठ्या संख्येने स्त्यावर उतरले. नाट्यगृहासमोरच भर पावसात त्यांनी आंदोलन करत खाजगीकरणाला विरोध केला. खाजगीकरणाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. 

रंगकर्मी सुनील घोरपडे, अभिनेता  सागर तळाशीकर, आनंद काळे, अभिनेता स्वप्नील राजशेखर, कला शिक्षक सागर बगाडे, प्रसाद जमदग्नी, धनंजय पाटील, हर्षल सुर्वे, दिनेश माळी, किरणसिंह चव्हाण, रोहन घोरपडे, युवराज घोरपडे, सुनील माने, राजश्री खटावकर, सर्जेराव पाटील, सचिन मोरे, अमर मोरे, भालचंद्र काळे यश शिंदे श्रेयस सोनार प्रा.  ए जी जोशी,  सतीश स्वामी, संग्राम भालकर, पद्माकर कापसे , धनंजय पाटील, संजय हळदीकर नरहर कुलकर्णी, किरणसिंह चव्हाण, उमेश पोवार, अमित अडसुळे, पंडित कंदले, शाहीर दिलीप सावंत आदींचा समावेश होता . 'संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे खाजगीकरण थांबवा,  मी, छत्रपती शाहू राजांचा वारसा- मला दुसऱ्यांच्या घरी बांधू नका' अशा आशयचे फलक कलाकारानी हातात घेऊन आंदोलन केले. 'रद्द करा रद्द करा, केशवराव भोसले नाट्यगृहाचे खाजगीकरण रद्द करा, नाट्यगृहाचे खाजगीकरण करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो.' अशा घोषणा देत रंगकर्मीकोल्हापूर महापालिकेचा निषेध केला. महापालिका प्रशासनाने संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाचा निर्णय रद्द केला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes