उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाईंची बदली
schedule27 Sep 24 person by visibility 13967 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य शासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांची बार्शी येथे बदली झाली आहे. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने या संदर्भातील आदेश 26 सप्टेंबर रोजी काढला आहे. देसाई यांची बदली सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारीपदी झाली आहे.
सप्टेंबर 2020 पासून त्या कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत होत्या. देसाई यांनी यापूर्वी विविध पदावर काम केले आहे. 2002 मध्ये पप्रोबेशनरी गटविकास अधिकारी म्हणून रत्नागिरी येथे कारकीर्दीला सुरुवात झाली. यानंतर कागल व उत्तर सोलापूर येथे त्यांनी बाल विकास अधिकारी म्हणून काम केले. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याण, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली होती. मोहोळ येथे गटविकास अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले. 2018 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत त्यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायत विभागाची जबाबदारी सांभाळली होती. सप्टेंबर 2020 पासून त्या कोल्हापूर जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत होत्या. त्यांनी आपल्या कामकाजातून छाप पडली होती. त्यांची आता बार्शी येथे बदली झाली आहे