जीवाची पर्वा न करता कोरोना कालावधीत नागरिकांना मदत, महापुरातही दिला नागरिकांना आधार
schedule09 Jan 26 person by visibility 40 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोरोनाचा कालावधी हा भयंकर. लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार ठप्प. लहानसहान व्यवसायही बंद होते. कपूर वसाहत परिसरात तर सारा कष्टकरी समाज. व्यापार, व्यवसाय बंद झाल्यामुळे साऱ्यांनाच आर्थिक अडचणी…या कालावधीत वैभव माने यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन, दोन महिने परिसरातील सामान्य लोकांना भाजीपाला पुरवठा केला. रोज दोन भाजीपाला पोहोच केल्या. कोरोनाग्रस्त लोकांना आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. औषधोपचार मिळवून दिले. अनेकदा चारचाकी वाहनातून रुग्णांना हॉस्पिटलला पोहोचविले. कोव्हिड प्रतिबंधक सेंटरमध्ये जाऊन रुग्णांना दिलासा दिला.
तत्कालिन गटनेते व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजीत कदम, माजी महापौर सुनील कदम व महाडिक कुटुंबीयांच्या पाठबळामुळे मोठया प्रमाणात मदत यंत्रणा राबविली. २०१५ मधील महापालिका निवडणुकीत कदमवाडी प्रभागातून कविता वैभव माने या निवडून आल्या होत्या. या भागातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्याच्या सोडवणुकीला प्राधान्य दिले. २०१९ व २०२१ मध्ये मध्ये महापुराची आपत्ती कोसळली. भागातील अनेक लोकांना स्थलांतरित केले. स्थलांतरित ठिकाणी त्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. कित्येकदा पदरमोड करुन साहित्य उपलब्ध केले. भागातील नागरिकांना अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला. पूरबाधित लोकांना मदत करताना कविता माने व वैभव माने हे पूरबाधित लोकांना ज्या ठिकाणी स्थलांतरित केले होते, त्या ठिकाणी मुक्कामाला राहिले. त्या लोकांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये, अडचणींचा सामना करावा लागू नये ही त्यामागील भावना होती.
आपत्तीच्या काळात मदतीला धावून जाण्याची वृत्ती वैभव माने यांची आहे. धडपडणारा कार्यकर्ता म्हणून प्रभागात ओळख आहे. आता महापालिका निवडणूक कालावधीत प्रचाराच्या निमित्ताने मतदारांना भेटताना नागरिक आवर्जून कोरोना आणि महापुराच्या मदतीत केलेल्या कामाची आठवण सांगतात. महापालिका निवडणुकीत मदतीची ग्वाही देत आहेत. वैभव माने हे प्रभाग क्रमांक दोनमध्ये महायुतीचे उमेदवार आहेत. शिवसेनेकडून धनुष्यबाण चिन्हावर लढत आहेत. त्यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे