डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या स्वप्नील अलंगे यांची बीआयएसएजी-एनमध्ये निवड
schedule09 May 26 person by visibility 20 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एआयएमएल विभागाच्या 2024-25 बॅचमधील विद्यार्थी स्वप्नील अलंगे यांची भास्कराचार्य इन्स्टिट्यूट फॉर स्पेस एप्लिकेशन्स ॲन्ड जिओ इन्फॉर्मेटिक्स येथे एआयएमएल इंजिनियर पदावर निवड झाली आहे. ही संस्था मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अंतर्गत कार्यरत आहे.स्वप्नील यांच्या या यशामुळे डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच एआयएमएल विभागाचा गौरव वाढला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी अभिनंदन केले.