Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खडके अकॅडमी बोरपाडळेचा दहावीचा सलग अकराव्या वर्षी शंभर टक्के निकालआबिटकर इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्केनूतन मराठी विद्यालयचा दहावीचा निकाल ८१ टक्केप्रकाश बेलवाडेंवर हल्ल्याचा प्रयत्न, एक जण जखमीकोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय ! तीन जिल्ह्यातील ९२८ शाळांचा निकाल शंभर टक्के ! !अशोक गाडे, दुग्धचे उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्यावर कारवाईची मागणीयंग सिनीअर्सची रंग-रेषांची दुनिया ! शाहू स्मारक भवनमध्ये चित्र प्रदर्शन !! सत्तेत असताना सतेज पाटलांनी काय केले, आता आंदोलनाची नाटके कशासाठी – आमदार राजेश क्षीरसागरव्ही. बी. पाटलांचे मंत्री मुश्रीफांच्यावर गंभीर आरोप, भैया मानेंचा पलटवारद्रूतगती महामार्गावर ई चलनद्वारे बसधारकांची आर्थिक लूट, प्रदीप राठोडांचे सोमवारपासून आमरण उपोषण

जाहिरात

 

आबिटकर इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के

schedule08 May 26 person by visibility 12 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत गारगोटी येथील श्री. आनंदराव आबिटकर इंग्लिश मिडीयम स्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली.

विद्यालयातील विद्यार्थिनी श्रावणी डवंग हिने ९६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक व गणित विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले. तसेच राजलक्ष्मी हुपरीकर हिने ९५ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. याशिवाय अनिशा चव्हाण  हिने ८९ टक्के, आदिराज पाटील याने ८८.८० टक्के तर रुद्र भालेकर याने ८८.४०  टक्के गुण मिळवले. दरम्यान ‘ केवळ मार्क मिळवणे हे आमचे उद्दिष्ट नसून, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या जिद्द आणि कष्टाला योग्य दिशा देणे हेच आमच्या यशाचे गमक असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी सांगिले.  विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम माने यांनी सांगितले की, “विद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहिले आहे. विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन आणि पालकांचा भक्कम पाठिंबा यामुळेच हे यश शक्य झाले आहे.”

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes