सत्तेत असताना सतेज पाटलांनी काय केले, आता आंदोलनाची नाटके कशासाठी – आमदार राजेश क्षीरसागर
schedule07 May 26 person by visibility 15 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सत्तेत असताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी काही केले नाही. केवळ मिळवायचे काम केले. आणि आता ते पाण्यासाठी आंदोलनाची नाटके करत आहेत.’अशी बोचरी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तेरा गावातील जलजीवन योजनेचे काम रखडल्याच आरोप करत काँग्रेसतर्फे गुरुवारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात महायुती सरकारवर टीका करण्यात आली. या आंदोलनावरुन आमदार क्षीरसागर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. आमदार पाटील यांच्याकडे महापालिकेची सत्ता होती, जिल्हा परिषदेत सत्ता होते. ते जिल्हयाचे पालकमंत्री होते. या कालावधीत त्यांनी शहरासाठी काय केले ? आणि आता मोर्चा काढतात. आंदोलनाची नाटके कशासाठी ? मोर्चा कोण काढते ? त्यांना विकासकामे करायला कुणी अडवले होते का ?असा सवालही क्षीरसागर यांनी केला.