नूतन मराठी विद्यालयचा दहावीचा निकाल ८१ टक्के
schedule08 May 26 person by visibility 23 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी संचलित नूतन मराठी विद्यालय हायस्कूलचा दहावीचा निकाल ८१.८१ टक्के इतका लागला आहे. धनश्री धनंजय बेदरे ह्या विद्यार्थिनीने ९१ मार्क मिळवत शाळेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. आदिनाथ केदार मुनिश्वर या विद्यार्थ्याला ९०.६० टक्के गुण मिळाले असून तो शाळेमध्ये द्वितीय आला. विनायक विजय जाधव या विद्यार्थ्याने ८०.२० टक्के गुण मिळवले . यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक धनंजय बेदरे, जिमखाना प्रमुख रश्मी भागवत व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.