शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी धैर्यशील माने
schedule31 Jul 24 person by visibility 434 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : लोकसभा शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांची निवड करण्यात आली. माने हे लोकसभेवर दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत.
मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कळविले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आहेत.. माने हे हातकणगंले लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तरुण व अभ्यासू लोकप्रतिनिधी, प्रभावी वक्ता म्हणूनही त्यांची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत माने यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांचा पराभव केला होता शिवसेनेतल्या घडामोडीनंतर माने यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना साथ दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कालावधीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापुरात तीन दिवस मुक्काम ठोकला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी जातीनिशी लक्ष घालून माने यांच्या विजयासाठी जोडण्या केल्या होत्या.