भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन करवीर तालुकाध्यक्षपदी मन्सूर सय्यद
schedule05 Jul 26 person by visibility 16 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या करवीर तालुका अध्यक्षपदी मन्सूर सय्यद यांची तीन वर्षांसाठी निवड केली आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाली आहे. संघटनेच्या नियुक्तीपत्रानुसार, प्रजासत्ताक देशाचे जबाबदार नागरिक म्हणून लोकशाहीचे संरक्षण, जनहितासाठी सत्यनिष्ठेने कार्य करणे, निस्वार्थ समाजसेवा करणे आणि भ्रष्टाचारविरोधी चळवळ तळागाळातील जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.