Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नवा नेता…नवा पक्ष ! वर्षभरात ५० नगरसेवकांचे पक्षांतर ! !शिक्षकांना त्रास दिला तर ते विद्यार्थी कसे घडवतील ? आमदार रोहित पाटील, जयंत आसगावकरांनी टीईटी सक्तीवरुन वेधले सरकारचे लक्षमहापलिकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने मागितल्या वीस जागा ! इंडिया आघाडीत चर्चा सुरू ! !आयटी पार्क स्थापनेसह जागा उपलब्धतेस सरकारची मंजुरी -आमदार राजेश क्षीरसागर मेरी वेदर क्रिकेट क्लबतर्फे पंचगंगा स्मशानभूमीला शेणीदान कोल्हापूरच्या आयटी पार्कचा निर्णय अंतिम टप्प्यात, अमल महाडिकानी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट भाऊ पाध्ये हे मानवतावादी, अनुभववादी लेखक - समीक्षक प्रा. अविनाश सप्रे कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याघघ ततकोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यास तत्वत: मान्यता - राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावा, क्रीडामंत्र्यांचे विधीमंडळात उत्तर !!

जाहिरात

 

महाडिक- मुश्रीफांची बुलेटवारी : चर्चेची नवी राजकीय वारी!!

schedule25 Dec 23 person by visibility 1115 categoryराजकीय

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : महाराष्ट्रातील सत्ता बदलानंतर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील मनोमिलन स्थानिक पातळीवरही ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. पूर्वी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे भाजप - राष्ट्रवादीवाले आता हातात हात घालून महायुतीचे गोडवे गात आहेत. कोल्हापुरात सोमवारी भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक आणि राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांची बुलेटवारी राजकीय चर्चेची नवी वारी ठरली‌. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलीस दलाला अत्याधुनिक वाहने प्रदान करण्याच्या निमित्ताने महाडिक आणि मुश्रीफ यांनी एकाच बुलेटवरून फेरी मारली. महाडिक यांनी बुलेट चालवली तर मुश्रीफ हे पाठीमागे बसले होते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलाच्या बळकटी करण्यासाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर आहेत. त्यापैकी 84 लाख निधी पोलीस दलाला प्रदान करण्यात आला आहे. या निधीतून पोलीस दलासाठी नवीन वाहने खरेदी केले आहेत. यामध्ये अकरा स्कार्पिओ सहा न्यू बोलेरो तीन बलेरो दोन मोठ्या बस, एक मिनी बस, एक ट्रक बारा ग्लॅमर आणि चार बुलेट व एक एसी डॉग व्हॅन खरेदी केले आहे. यापैकी अनेक वाहने उपलब्ध झाले आहेत. खासदार व मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही वाहने पोलीस दलाला प्रदान करण्यात आली. पोलीस दलाला वाहन प्रदान करण्याच्या या कार्यक्रमाप्रसंगी आमदार पी. एन. पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान खासदार महाडिक व मंत्री मुश्रीफ यांनी नवीन बुलेट चालवून वाहनांचे उद्घाटन केले.
 २०१४ मध्ये खासदार महाडिक व मंत्री मुश्रीफ हे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र होते. त्यावेळी खासदार महाडिक यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली होती. त्या निवडणुकीत मुश्रीफ यांची भक्कम साथ महाडिक यांना मिळाली होती. दरम्यान २०१४ ते २०१९ च्या कालावधीत बरेच राजकारण झाले. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढलेल्या धनंजय महाडिक यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना येथील नेते मंडळींनी आमच्या ठरलंय म्हणत एकत्र आले आणि संजय मंडलिक खासदार झाले. पुढे महाडिक यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले. खासदार महाडिक आणि मुश्रीफ हे वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांच्यामध्ये कधी टोकाचे आरोप प्रत्यारोप झाले नाहीत. राजकीय टीकाटिप्पणी ही कधी व्यक्तिगत पातळीवर घसरले नाही. सहकाराच्या निवडणुकीत दोघे आमने-सामने उभे राहिले पण दोघांनीही एकमेकावर जहरी टीका कधी केली नाही.
 सध्या दोघेही महायुतीचे घटक आहेत. शिंदे- फडवणी सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांना मंत्रीपदाची पुन्हा संधी मिळाली. त्यांच्यावरील ईडीच्या चौकशीही थांबले आहेत. एकेकाळी शरद पवार एक शरद पवार असा घोष करणारे हसन मुश्रीफ सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गात असतात. २०२४ मध्ये मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असा करण्यापर्यंत मुश्रीफांचे मोदी प्रेम वाढले आहे. लोकसभेच्या निवडणुकीला सहा महिन्याचा अवधी आहे. महायुतीकडून उमेदवार कोण असणार ? विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी मिळणार की चेहरा बदलणार ? याविषयी उत्सुकता आहे. कमळ चिन्हावर कोल्हापूरचा खासदार निवडून‌ आणण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. उमेदवारी कोणाला हे अजून गुलदस्त्यात असताना वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू आहे. विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असा दावा शिवसेना शिंदे गट करत आहे. तर "भाजपचे नेते मंडळी जो आदेश देतील त्या पद्धतीने काम करणार, पक्ष जो उमेदवार देई त्याला निवडून आणणार आणि पक्षाने सांगितले तर निवडणूक ही लढविणार "अशी खुली भूमिका खासदार धनंजय महाडिक यांनी यापूर्वी मांडले आहे. दुसरीकडे महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणू अशी ग्वाही मुश्रीफ देत असतात. त्यामुळे लोकसभेला महायुतीचा उमेदवार कोण याविषयी उत्कंठा वाढत चालली आहे. दरम्यान खासदार महाडिक आणि मंत्री मुश्रीफ यांच्यातील जवळीक महायुतीला बळ देणारे आहे. उमेदवार कोण का असेना मात्र २०२४ मधील कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक महायुतीची मदार या दोघांवर असणार हे निश्चित आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes