Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बदलीसाठी बनावटगिरी, २६ शिक्षकांचे प्रमाणपत्र सदोष ! २७ शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पुणे-मुंबईत पडताळणी !!फुलेवाडीत बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरेंटची दुसरी शाखा, गुरुवारी उद्घाटन ! ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी डी वाय पाटील विद्यापीठाला पेटंटकोल्हापूरच्या कलाकारांची सिनेनिर्मिती, शुक्रवारपासून सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीलात्रिभाषा धोरण निश्चित समिती शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावरडेप्युटी सीईओ अरुण जाधव, शैलेश पाटणकरची होणार संयुक्त चौकशी ? निलंबनानंतर आता विभागीय चौकशीचा ससेमिरा !डॉ. सतीश पत्की यांना डॉ. अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्कारनिवडणुका झाल्यानंतर गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धा –नविद मुश्रीफकेएमएच्यावतीने दोन दिवसीय केएमकॉन वैद्यकिय परिषद, ७०० प्रतिनिधींचा सहभाग स्मॅकच्या चेअरमनपदी जयदीप चौगले, व्हाईस चेअरमनपदी भरत जाधव

जाहिरात

 

ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी डी वाय पाटील विद्यापीठाला पेटंट

schedule29 Oct 25 person by visibility 24 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकानी उर्जा संचयासाठी संशोधित केलेल्या नव्या सिलार रासायनिक पद्धतीसाठी भारत सरकारकडून पेटंट जाहीर झाले आहे. 

संशोधन विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पोरस रिड्यूस्ड ग्राफीन ऑक्साइड /रुधेनियम ऑक्साइड कोटींग फॉर एनर्जी स्टोरेज अ‍ॅप्लिकेशन’ या विषयावर हे संशोधन करण्यात आले.  पुढील २० वर्षांसाठी मिळाला असून, या संशोधनामुळे शास्त्रज्ञांना ऊर्जा संचयासाठी नवे तंत्रज्ञान प्राप्त झाले आहे. 

  ही नवीन प्रक्रिया ऊर्जा साठवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या सुपरकॅपेसिटर आणि बॅटरीसाठी प्रभावी आणि कार्यक्षम 'थिन फिल्म्स' विकसित करण्यासाठी वापरली जाईल. ही पद्धत सिलार रासायनिक प्रक्रियेद्वारे विकसित करण्यात आली असून, ती तुलनेने अधिक सोपी आणि कमी खर्चिक आहे. उर्जा क्षेत्रासाठी ही मोठी उपलब्धी असल्याचे डॉ. लोखंडे यांनी सांगितले. या संशोधन कार्यात मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे यांच्यासह संशोधक विद्यार्थी डॉ. अजिंक्य बगडे, डॉ. दिव्या पवार,  ज्योती थोरात आणि डॉ. अभिषेक लोखंडे यांचा सहभाग होता. या संशोधनासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes