Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चित्रकार भाऊसो पाटील यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शनशिवसेना ठाकरे पक्षाचा ३३ जागांचा प्रस्ताव, काँग्रेस समितीसोबत प्राथमिक चर्चाभाजपाकडे शेकडो इच्छुकांचे अर्ज, मुलाखतीनंतर प्रभागात सर्व्हेक्षण !यसबा करंडकचा मानकरी वसंतराव चौगुले इंग्लिश स्कूल ! उपविजेतेपद विमला गोयंका स्कूलला ! !नवा नेता…नवा पक्ष ! वर्षभरात ५० नगरसेवकांचे पक्षांतर ! !शिक्षकांना त्रास दिला तर ते विद्यार्थी कसे घडवतील ? आमदार रोहित पाटील, जयंत आसगावकरांनी टीईटी सक्तीवरुन वेधले सरकारचे लक्षमहापलिकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने मागितल्या वीस जागा ! इंडिया आघाडीत चर्चा सुरू ! !आयटी पार्क स्थापनेसह जागा उपलब्धतेस सरकारची मंजुरी -आमदार राजेश क्षीरसागर मेरी वेदर क्रिकेट क्लबतर्फे पंचगंगा स्मशानभूमीला शेणीदान कोल्हापूरच्या आयटी पार्कचा निर्णय अंतिम टप्प्यात, अमल महाडिकानी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

जाहिरात

 

केएमएच्यावतीने दोन दिवसीय केएमकॉन वैद्यकिय परिषद, ७०० प्रतिनिधींचा सहभाग

schedule28 Oct 25 person by visibility 265 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने येत्या १ व २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन  केले आहे.यंदा  यंदा परिषदेच्या केंद्रस्थानी ‘वैद्यकीय दृष्टीकोन केवळ शारिरीक लक्षणांच्या उपचारापुरता मर्यादित न ठेवता तो मानसिक व भावनिक आरोग्याकडेही केंद्रीत झाला पाहिजे.दृढ सामाजिक नातेसंबंध हे शरीर, मन आणि आत्म्यासाठी औषधाप्रमाणे काम करतात’ ही संकल्पना आहे. या दोन दिवसीय परिषदेत ७०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत अशी माहिती कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एम. कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.हॉटेल सयाजी येथील मेघमल्हार सभागृहात ही परिषद होणार आहे.

     कोल्हापूर आणि परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना वैद्यकशास्त्रातील नव्या घडामोडी, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या संशोधनाची ओळख करून देणे, हा केएमकॉन या वैद्यकीय परिषदेचा मुख्य हेतू आहे. यंदा मुंबईचे नामवंत हेमॅटॉलॉजिस्ट डॉ. एम. बी. अगरवाल, न्यूरॉलॉजिस्ट डॉ. सतीश खाडिलकर, सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील क्रिटिकल केअर तज्ज्ञ डॉ. उमेश शहा, पुण्याचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. एन. जे. कर्णे, डायबेटॉलॉजिस्ट डॉ. शैलजा काळे, वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. सुप्रिया पुराणिक, यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. बिपीन विभूते आणि डॉ. हंचनाळे, बेंगळुरूचे न्यूरोसर्जन डॉ. विकास, बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजयलक्ष्मी मार्गदर्शन करतील.
 परिषदेचा उद्घाटन सोहळा शनिवारी १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता आहे. विधानपरिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे हे मुख्य अतिथी असतील. विशेष निमंत्रित म्हणून इस्त्रोचे उपसंचालक डॉ. एस. व्ही. शर्मा आणि डॉ. आय. बी. विजयलक्ष्मी उपस्थित राहणार आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात केरळमधील वादकचमूचे फ्युजन इन्स्ट्रुमेंटल म्युझिक व कार्यशाळा हे विशेष आकर्षण असेल.
असोसिएशनव्दारे दरवर्षी दिला जाणारा डॉ.अतुल जोगळेकर जीवनगौरव पुरस्कार या वर्षी ख्यातनाम स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ डॉ.सतीश पत्की यांना देण्यात येणार आहे. २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता पुरस्कार वितरण समारंभ आहे. याच दिवशी दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत “डॉक्टर आणि जनतेचा संवाद मंच” आहे. यामध्ये ‘आरोग्य, आहार आणि अध्यात्मिक नाते’ या विषयावर चर्चासत्र आहे. चर्चासत्रात प्रसिध्द आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित, योगतज्ज्ञ डॉ. समप्रसाद विनोद आणि हृदयरोगतज्ञ डॉ. आय. बी. विजयलक्ष्मी हे संवाद साधणार आहेत. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष डॉ. ए.बी.पाटील, सचिव डॉ. अरुण धुमाळे, परिषदेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र चिंचणीकर, डॉ. शरद टोपकर , डॉ.शीतल पाटील, डॉ.संदीप पाटील आदी उपस्थित होते.

:

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes