डॉ. सतीश पत्की यांना डॉ. अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्कार
schedule28 Oct 25 person by visibility 59 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन आणि सेवेबद्दल दिला जाणारा ‘डॉ.अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्कार ’ यंदा ख्यातनाम स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांना जाहीर झाला आहे. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी बारा वाजता पुरस्कार वितरण समारंभ आहे.केएमएतर्फे आयोजित दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेच्या कालावधीत हा पुरस्कार वितरण करण्यात येत असल्याचे अध्यक्ष डॉ. आर. एम. कुलकर्णी यांनी घोषित केले.
केएमएतर्फे येत्या १ व २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन केले आहे. हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या या परिषदेच्या केंद्रस्थानी ‘वैद्यकीय दृष्टीकोन केवळ शारिरीक लक्षणांच्या उपचारापुरता मर्यादित न ठेवता तो मानसिक व भावनिक आरोग्याकडेही केंद्रीत झाला पाहिजे.दृढ सामाजिक नातेसंबंध हे शरीर, मन आणि आत्म्यासाठी औषधाप्रमाणे काम करतात’ ही संकल्पना आहे. या परिषदेत असोसिएशनव्दारे दरवर्षी दिला जाणारा डॉ.अतुल जोगळेकर जीवनगौरव पुरस्कार या वर्षी ख्यातनाम स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ डॉ.सतीश पत्की यांना देण्यात येणार आहे. २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता पुरस्कार वितरण समारंभ आहे.रोख रक्कम, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. वैद्यकीय क्षेत्रात राष्ट्रीय व आतंराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या डॉक्टरांना असोसिएशनतर्फे पुरस्कार देऊन गौरविले जाते. डॉ. पत्की हे ख्यातनाम स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. वैद्यकीय सेवा, संशोधनात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा वैद्यकीय क्षेत्रातील तरुण डॉक्टरांनी आदर्श घ्यावा. वैद्यकीय सेवा करावी या उद्देशाने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.