कोरे अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांची दक्षिण आफ्रिकेतील कंपनीत निवड
schedule29 Sep 26 person by visibility 21 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : वारणा विद्यापीठाच्या अग्रणी तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या सिव्हिल अभियांत्रिकी विभागातील सात विद्यार्थ्यांची मॉडर्न कन्स्ट्रक्शन (किन्शासा, काँगो, दक्षिण आफ्रिका) या आंतरराष्ट्रीय कंपनीत ज्युनिअर सिव्हिल इंजिनिअर पदासाठी निवड झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आयुष पाटील, रविराज देसाई, तेजस पाटील, सुरज शिंदे, साहिल पाटील, रोहित बिरंजे आणि ओंकार जाधव यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांची निवड कॅम्पस मुलाखतीद्वारे वारणानगर मध्ये करण्यात आली.
मॉडर्न कन्स्ट्रक्शन ही दक्षिण आफ्रिका व काँगो येथे बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय कंपनी असून हॉस्पिटल तसेच औद्योगिक प्रकल्पांच्या निर्मितीमध्ये कंपनीचे योगदान आहे. कंपनीत १००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहे.
या निवड प्रक्रियेत इथरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक अभिजित चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मॉडर्न कन्स्ट्रक्शनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सुरज बेनाडे यांनी विद्यार्थ्यांच्या निवड प्रक्रियेचे समन्वयन करून ही प्रक्रिया पूर्ण केली.
वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, प्राचार्य के. आय. पाटील व अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी. जे. पाटील, सहयोगी प्रा. आर. सी. शिकेरी, सिव्हिल विभागप्रमुख डॉ. डी. एम. पाटील आणि प्रा. ए. व्ही. हंकारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.