Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सत्ताधारी संचालकांनी सभासदांची दिशाभूल थांबवावी, गेल्या चार वर्षाची कामगिरी मांडावी ! दोन अंकी लाभांश, एक अंकी व्याजदर केव्हा देणार ते सांगा !!डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये गौराई खेळ' स्पर्धा उत्साहातशिवराजे स्पोर्ट्सतर्फे गरीब-होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपशिक्षकांच्या प्रश्नांना विधीमंडळात आवाज देण्यासाठी माझी उमेदवारी- प्रा. सचिन सानपलोकसंवाद-२०२६ उपक्रमांतर्गत आष्टा, कसबे डिग्रजमध्ये प्रबोधनजतमध्ये तहसीलदारांनी साधला गणेशभक्तांशी संवाद, महिला सक्षमीकरण, सायबर सुरक्षेबाबत  मार्गदर्शनमानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या उद्घाटनाने विसर्जन मिरवणूकीस सुरवातआत्मातर्फे सोमवारी रानभाजी महोत्सव सत्यजीत पाटील गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांच्या समविचारी आघाडी सोबतमहायुतीत कोणी छोटा- मोठा नाही, आम्ही सगळे जुळेभाऊ ! आमच्याकडे ४४०० ठराव, शुक्रवारी प्रचार शुभारंभ ! !

जाहिरात

 

सत्ताधारी संचालकांनी सभासदांची दिशाभूल थांबवावी, गेल्या चार वर्षाची कामगिरी मांडावी ! दोन अंकी लाभांश, एक अंकी व्याजदर केव्हा देणार ते सांगा !!

schedule26 Sep 26 person by visibility 394 categoryशैक्षणिक

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : 'दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील सत्ताधारी संचालक मंडळाचा कारभार हा मनमानी पद्धतीने सुरू आहे. सध्याच्या संचालक मंडळाने 2025-26 या वर्षाचा वार्षिक ताळेबंद प्रसिद्ध केला आहे. यामध्ये दाखवलेला नफा हा बोगस आहे, अनेक तरतुदी केल्या नाहीत. सत्तारूढ संचालक मंडळाचा कारभार हा बँकेला तोटयाकडे घेऊन चालणार आहे.  बँकेच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला तर 33 टक्के बँक तोट्यात दिसते. रविवारी होणाऱ्या 88 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सध्याच्या संचालक मंडळांनी गेल्या चार वर्षांमध्ये जो कारभार केला तो सभासदासमोर मांडावा. दोन अंकी लाभांश व एक अंकी व्याजदराची आकारणी कधीपासून सुरू होणार ? हे सभासदांना सांगावे. मागील काळातील संचालकांच्या चुका उगाळत सभासदांचे दिशाभूल करू नये.' असा टोला प्राथमिक शिक्षक संघाचे ( माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) जिल्हाध्यक्ष बबन केकरे, बँकेचे माजी अध्यक्ष संभाजी बापट, बाजीराव कांबळे, प्रशांत पोतदार, साहेबराव शेख यांनी लगावला. त्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी संचालक मंडळाचा कामकाज योग्य पद्धतीने सुरू नाही हे आकडेवारीसह सांगितले
 ' मागील संचालक मंडळावर चेअरमनपदाची खांडोळी केली असा आरोप झाला. मात्र सध्याच्या संचालक मंडळांनी एका वर्षात चार-चार चेअरमन केले. ही पदाची तुकडे म्हणायची  की खांडोळी ? वर्षात चार चेअरमन झाल्यामुळे वार्षिक सभेला उत्तरे कोण देणार ? वर्षभरातील कामकाजाची जबाबदारी कोणाची ? असा प्रश्न सभासदांना पडत आहे. मागील संचालक मंडळांनी बुडीत कर्ज निधी फंडातून अतिरिक्त तरतूद 48 लाख रुपये नफ्याला घेतली म्हणून 2022 चा नफा बोगस आहे असे सांगत सध्याच्या संचालक मंडळांने स सभासदांना मिळणारा 7 टक्के  डिव्हिडंट वाटला नाही. मात्र यावर्षी विद्यमान संचालक मंडळाने बुडीत कर्ज निधी फंडामधून 60 लाख रुपये नफ्याला घेतलेत. तेव्हा हा नफा अयोग्य व चुकीचा आहे का ? याचे उत्तर मिळावे. शिवाय बँकेने अनेक बाबीसाठी तरतुदी केल्या नाहीत. तरतुदी न करता संबंधित रक्कम नफा म्हणून दाखवली. शिवाय मागील संचालक मंडळांनी ज्या तरतुदी  केल्या होत्या त्या आधारे यंदाचा नफ्याचा फुगवटा दिसत आहे.'
  सध्याच्या संचालक मंडळाने अनेक तरतुदी केलेल्या नाहीत. मुदत बंद ठेव वरती फक्त दहा लाख 72 हजार रुपये 49 इतकी रक्कम तरतूद केली आहे दीड कोटीपेक्षा अधिक तरतूद करणे अपेक्षित होते. निवडणूकसाठी अकरा लाख रुपयांची तरतूद आवश्यक आहे. मात्र एक लाख रुपये तरतूद केले जात आहे. थक व्याज तरतूद पंधरा लाखांनी कमी केले आहे. कर्मचारी , ग्रॅज्युएटी,  रजा पगार तरतुदी नियमाप्रमाणे केलेल्या नाहीत. मागील वर्षी गुंतवणूक तूट निधी 50 लाख रुपये नफ्याला घेतले होते त्याची पूर्ण तरतूद केलेली नाही. मागील वर्षी कमी केलेला घसारा फंड पंधरा लाख रुपये तरतूद केलेली नाही. अमृत संजीवनी कर्जमाफी निधी योजनेवरती व्याज आकारणी कमी केलेली आहे वरील सर्व तरतुदी व बुडीत कर्ज मधून काढलेली रक्कम व जादा नफा दाखवल्यामुळे भरावा लागणारा ज्यादा इन्कम टॅक्स वजा जाता नफा चुकीचा आहे. ताळेबंद चुकीचा दिसतो.' असेही प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकारी व माजी अध्यक्षांनी सांगितले. सध्याच्या संचालक मंडळाचा कारभार चांगला आहे असे सत्ताधारी ढोल बजावत असतात मग प्रत्येक वर्षी कर्ज वाटपाचे प्रमाण कमी का होत आहे. कामकाज काटकसररचा  म्हणतात मग खर्च का वाढत आहे. 2024-25 मध्ये सहा कोटी 80 लाख रुपयांची कर्ज कमी झाली तर 2025 -26 मध्ये 6 कोटी 43 लाख रुपयांनी कर्ज कमी झाले आहेत याचा अर्थ कारभार चांगला  कसा म्हणायचा ?  सभासदांचा संचालक मंडळावरील विश्वास कमी होत असल्याचे हे द्योतक आहे.'
   गेल्या चार वर्षात सेवानिवृत्त सभासद , शिक्षक, सभासदांचे प्राविण्य प्राप्त मुले, विविध परीक्षेत यश मिळवलेले शिक्षक यांचा तालुकानिहाय सत्कार झालेला नाही. तरीही समारंभ खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय विद्यमान संचालक मंडळाने चार संचालक वाढवण्याचा पोटनियम दुरुस्तीसाठी ठेवला आहे. संचालक संख्या वाढल्यामुळे बँकेचा व्यवसाय वाढणार नाही. पण संचालकांचा खर्च वाढणार आहे. सध्याच्या संचालक मंडळाने  मागील संचालक मंडळाच्या कालावधीतील नोकर भरतीवर मोठा वादंग केला होता. मात्र सत्ताधारी संचालकाने  पंधरा कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. पूर्वी सात वर्षांनी बढती दिली जायची, आता मात्र दोन वर्षात बढती दिली जात आहे. दोन वर्षात शिपाईला क्लार्क करण्याचा अजब प्रकार सध्याच्या संचालक मंडळांनी केला आहे. काही कर्मचारी हे चेअरमनांच्या घरी काम करतात. पन्हाळा शाखा पूर्वी तळमजल्यावर होती आता तिसऱ्या मजल्यावर हलवले आहे तेथील फर्निचर कोठे गेले ? एका चेअरमनांनी तर सभासद व इतर संचालकापेक्षा मी मोठा आहे हे दाखवण्यासाठी स्वतंत्र पार्किंगचा बोर्ड बँकेसमोर लावला.' अशा अशा शब्दात माजी संचालकाने हल्लाबोल केला.
 बँकेची सर्वसाधारण सभा शांततेने झाली पाहिजे. सभासदांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे सभा अध्यक्ष म्हणून चेअरमनांनी दिली पाहिजेत. सभा शांततेत व सभ्यपणे हाताळली पाहिजे असे संभाजी बापट म्हणाले. तर प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते राजाराम वरुटे म्हणाले, ' वार्षिक सभेत सभासदांना समाधानकारक उत्तरे मिळायला हवीत अशी आमची इच्छा आहे सभा शांततेत पार पाडण्यासाठी  आमची सहकार्याची भावना आहे.' पत्रकार परिषदेला संघाचे सरचिटणीस डी पी पाटील,  बँकेचे माजी अध्यक्ष राजमोहन पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा श्वेता खांडेकर, प्रताप राबाडे, श्रीकांत चव्हाण, मारुती दिंडे, मनोज माळवदकर, संजय ठाणेकर, डी एस पाटील आदी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes