Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कौशल्य विकासासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन-  शिवाजी विद्यापीठात लवकरच सामज्यंस करार -कुलगुरू डॉ.राजनीश कामतएसआयआर प्रक्रियेत गंभीर त्रुटी, नोंदणीसाठी मुदतवाढ हवी : काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतली जिल्हा प्रशासनाची भेटगव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र पंदारे, उपाध्यक्षपदी विलासराव कुरणेआता प्रशासक राजवट नाही –कामकाजात सदस्यांना विश्वासात घ्या, अध्यक्षांचे खडेबोल ! शिक्षणाधिकारी रजेवर !सहकार सप्ताहनिमित्त गोकुळमध्ये वृक्षारोपण, अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यानगोकुळची बदनामी थांबवा, शेतकरी कुटुंबांतील मुलगा करणार आत्मक्लेश आंदोलनप्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी बाबू धोंडीबा परीटअ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांचा बुधवारी ग्रंथतुला करुन जाहीर सत्कारशिष्यवृत्ती परीक्षेत महापालिका शाळा ठरल्या जिल्ह्यात अव्वलदुग्धजन्य पदार्थांच्या मूल्यवर्धनासंबंधी संशोधन, डॉ. ज्ञानेश्वर पंतगे यांच्या संशोधनाला पेटंट

जाहिरात

 

स्थायी समिती सभापतिपदी राष्ट्रवादीचे सचिन पाटील बिनविरोध ! विरोधी भाजप-ताराराणी आघाडी निवडणुकीपासून लांब

schedule25 Aug 20 person by visibility 587 categoryमहानगरपालिका

सभापतिपदासाठी सचिन पाटील यांचा एकमेव अर्ज, २८ तारखेला होणार निवडीची अधिकृत घोषणा, सत्ताधारी काँग्रेस आघाडी आणि विरोधी भाजप, ताराराणी आघाडीत काँटे की टक्कर दिसलीच नाही

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : महापौर आणि स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक म्हणजे कमालीची चुरस. सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी भारतीय जनता पक्ष व ताराराणी आघाडी यांच्यासाठी या निवडणुका म्हणजे प्रतिष्ठेच्या. निवडणुकीत शह, काटशहाचे राजकारण रंगणारे. बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ जमविण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न ठरलेले. गेल्या साडे चार वर्षात हे चित्र शहरवासियांनी अनेकदा पाहिलेले. सध्याच्या सभागृहाची मुदत संपण्यास तीन महिन्याचा कालावधी उरला असताना ही टोकाची ईर्षा सध्याच्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत दिसली नाही. संदीप कवाळे यांनी स्थायी समिती सभापतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. आणि आश्चर्यकारक म्हणजे, मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक सचिन पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.

यामुळे स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडीची औपचारिकता शिल्लक राहिली. २८ ऑगस्ट रोजी या पदासाठी निवडणूक होणार असून त्यादिवशी अधिकृतरित्या घोषणा होणार आहे. सध्याचा कोरोनाच्या संकटाचा कालावधी आणि सभागृहाची मुदत संपण्यास तीन महिन्याचा उरलेला कालावधी यामुळे विरोधी भाजप-ताराराणी आघाडी स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीपासून लांब राहिली. विरोधी आघाडी निवडणूक लढविणार नसल्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन पाटील यांच्या बिनविरोध निवडीची फक्त औपचारिक घोषणा करायचे तितके राहिले आहे.

स्थायी समिती सभागृहात एकूण सोळा सदस्य आहेत. त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य संख्या नऊ तर शिवसेनेचा एक सदस्य आहे. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीची सदस्य संख्या सहा आहे. महापालिकेच्या राजकारणात दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहेत. यामुळे सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची सदस्य संख्या दहापर्यंत पोहचते. सत्ताधारी आघाडीकडे बहुमताचा स्पष्ट आकडा आहे. यामुळे हाती फारसे काही लागणार नाही हे स्पष्ट दिसत असल्यामुळे विरोधी पक्ष निवडणुकीपासून लांब राहिला अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

………

नगरसेवक सचिन पाटील हे शिवाजी उद्यमनगर प्रभागातून निवडून आले आहेत. ते महापालिकेत पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करत आहेत. शिक्षण समितीचे उपसभापती आहेत.

………..

मोजक्या नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये भरला अर्ज

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सचिन पाटील यांनी मोजक्या नगरसेवकांच्या उपस्थितीमध्ये सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला.याप्रसंगी महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक प्रा.जयंत पाटील, नगरसेवक संदीप कवाळे, विनायक फाळके आदी उपस्थित होते.

सचिन पाटील यांच्या उमेदवारी अर्जाला काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख हे सूचक तर राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप कवाळे व शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान हे अनुमोदक आहेत. तर विरोधी गटात भाजप, ताराराणी आघाडीमध्ये निवडणूक लढविण्यासंदर्भात कसल्याही हालचाली नव्हत्या. यामागील गौडबंगाल काय असा प्रश्नच दोन्ही आघाडीचे नगरसेवक विचारत आहेत.

…………………..


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes