कोल्हापुरात उभारले चंदगड भवन
schedule08 Jan 22 person by visibility 480 category
आयटी हबसाठी हवी २०० एकर जागा
schedule08 Jul 20 person by visibility 639 categoryउद्योग
मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कागल-हातकणंगले औद्योगिक वसाहतीमध्ये आयटी हबसाठी २०० एकर जागा राखीव ठेवावी अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. त्यांनी मागणीचे पत्र उद्योगमंत्र्यांना दिले.
दोन्ही मंत्र्यांनी पत्रात पुढे म्हटले आहे, ‘कागल-हातकणंगले एमआयडीसी क्षेत्राचा पूर्ण विकास होत आहे. दरम्यान या औद्योगिक वसाहतीमधील शेकडो एकर जमीन विकसकांनी घेतल्या आहेत. मात्र त्या जमीनीवर नियमांना अनुसरुन कोणत्याही स्वरुपाचे उद्योग सुरू केले नाहीत. या ठिकाणी कंपन्यांनी उद्योग उभारले असते तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला असता.
दुसरीकडे बॉम्बे रेयॉन कंपनीला सुप्रीम कोर्टाने आपल्याकडी जमीन एमआयडीसीकडे परत करण्याचे आदेश दिले आहेत. यासह विकसित न झालेली अशी २०० एकर जागा आयटी हबसाठी राखून ठेवावी.’
……..