Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भाजपकडून जिपसाठी ४१, पंचायत समितीसाठी ७२ उमेदवार ! काही तालुक्यात स्वतंत्र, काही ठिकाणी युती! !शु्क्रवारी शाळा सकाळी भरणारगडहिंग्लज-चंदगड -आजरा तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, घडयाळ चिन्हावर लढणारकळंब्यात राजकीय घडामोडी ! काँग्रेसचे भोगम भाजपात, विनिता भोगमना जिल्हा परिषदेची उमेदवारी!!डॉ. जे. के. पवार लिखित अमृतमहोत्सवी भारत ग्रंथाचे प्रकाशनजिल्हा परिषदेच्या पाचगाव मतदारसंघात संग्राम पाटील विरुद्ध याज्ञसेनी महेश पाटीलएकवेळ सत्तेपासून दूर राहू पण काँग्रेससोबत जाणार नाही, लोकांनीच सतेज पाटलांचे फ्रंटडोअर राजकारण संपवले अकरा इच्छुकांचे एकमत, शौमिका महाडिकांना कुंभोजमधून उमेदवारी द्या : कार्यकर्त्यांनी गाठले भाजप कार्यालयसतेज पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातील नवीन वाघ - खासदार शाहू महाराजपाडळी खुर्दसाठी शिवसेनेकडून सचिन पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल

जाहिरात

 

गडहिंग्लज-चंदगड -आजरा तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, घडयाळ चिन्हावर लढणार

schedule21 Jan 26 person by visibility 57 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :गडहिंग्लजसह चंदगड व आजरा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावर एकत्र लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. या संदर्भात माजी आमदार राजेश पाटील व डॉ.  नंदिनी बाभुळकर यांच्यामध्ये समझोता झाला आहे. या दोन्हीही नेत्यांनी, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांच्या विजयाच्या आणाभाका घेतल्या. कोल्हापुरात मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. आघाडी करून गडहिंग्लज, चंदगड आजरा तालुक्यातील आठ जिल्हा परिषद मतदार संघ व १६ पंचायत समिती मतदार संघात घड्याळ या चिन्हावर उमेदवारांनी लढण्याबाबत एकमत झाले आहे.
     मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत. हा राज्यातील पहिला प्रयोग आहे.  माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली मी व बाबुळकर एकत्र आलो आहोत.  चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही हा पहिला प्रयोग केला होता. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवू आणि सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करू. बाभुळकर म्हणाल्या, महिन्यापूर्वीच चंदगड नगर पंचायतीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करण्याचा आम्ही पहिल्यांदा प्रयोग केला. त्याला चांगले यशही मिळाले.  आमचे नेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची आम्ही अनुमती घेतलेली आहे.   यावेळी रामराज कुपेकर, उदयराव जोशी, जयसिंग चव्हाण, अभय देसाई, एस. एन. पाटील, विजयराव गुरव, रामचंद्र गायकवाड आदी प्रमुख उपस्थित होते. 

.......................

मतदारसंघनिहाय जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार..... 
गडहिंग्लज तालुका-  नुल जिल्हा परिषद - तेजस्विनी पाटील, नूल पंचायत समिती - शिवगोंडा पाटील, हसुर चंपू पंचायत समिती- श्रीमती प्रभावती बागी. हलकर्णी जिल्हा परिषद - शिवशंकर हत्तरकी, हलकर्णी पंचायत समिती- अनिल देसाई, बसर्गे पंचायत समिती - रूपा केसरोळी. महागाव जिल्हा परिषद - अमरसिंह चव्हाण, महागाव पंचायत समिती- डॉ.प्रतिभा चव्हाण, भडगाव पंचायत समिती- शिवाजी करीगार. नेसरी जिल्हा परिषद- संग्रामसिंह कुपेकर, नेसरी पंचायत समिती- अमर हिडदुगी, हडलगे पंचायत समिती- स्नेहल जाधव. चंदगड तालुका-  अडकुर जि-प- अलकनंदा अंबादास पाटील, अडकूर पंचायत समिती हणमंतराव दत्ताजीराव देसाई, गवसे- रेणुका दिपक कांबळे. माणगाव जिल्हा परिषद - मानसी कलाप्पा भोगम. माणगाव पंचायत समिती - विलास नाईक, कोवाड पंचायत समिती- गिता बामणे. कुदनुर जिल्हा परिषद - विद‌्या विलास पाटील.  कुदनुर प.स.- मधुकर आंबेवाडकर. तुर्केवाडी पं.स -  पांडुरंग कृष्णा बेणके. तुडिये जिपः- रचना राहुल गावडे, तुडीये पं.स. - प्रेमा जगन्नाथ हुलजी, हेरे पं.स. संज्योती संतोष मळवीकर. आजरा तालुका-  पेरणोली जिल्हा परिषद- सुधीर राजाराम देसाई, पेरणोली  पंचायत समिती -यशोदा युवराज पोवार, वाटंगी पंचायत समिती-  राजाराम गुणाजी होलम.   

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes