शु्क्रवारी शाळा सकाळी भरणार
schedule21 Jan 26 person by visibility 86 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने शुक्रवारी, २३ जानेवारी २०२६ रोजी संबंधित शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले आहे. यामुळे शुक्रवारी माध्यमिक व प्राथमिक शाळ सकाळी ७.३० वाजता भरणार आहे. अशी माहिती माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत व प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी दिली आहे.