
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्हा परिषद ,कोल्हापूरकडील क्रीडा स्पर्धेस सोमवारी (३० जानेवारी) उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी कै. दिलीपराव देसाई बॅडमिंटन कोर्ट सासने ग्राऊंड येथे बॅडमिंटन पुरुष एकेरी स्पर्धा झाली. स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांचे हस्ते फीत कापून झाले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई , सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई या उपस्थित होत्या
स्पर्धेच्या प्रारंभी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने प्रकल्प संचालक सुषमा देसाई , सामान्य प्रशासन विभागाच्या मनीषा देसाई यांनी स्वत: बॅडमिंटन खेळून स्पर्धेस प्रोत्साहन दिले.